Kabir Singh Viral Kissing Scene BTS Video: सिनेमातले सीन्स आपण पाहतो, त्याची वाहवाह करतो, पण ते सीन्स शूट करताना किती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, याबाबत फारच कमी लोकांना ठाऊक आहे. एक सीन शूट करताना खूप मेहनत आणि जुगाड करावे लागतात. एखाद्या भरधाव बाईकवर सीन शूट करणं किती कठीण असू शकतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? असे सीन्स करणं किती आव्हानात्मक असेल? विशेषतः कॅमेरामनसाठी. कारण सीन व्यवस्थित शूट करण्यासाठी एका भरधाव बाईकवर हिरो-हिरोईन असतानाही त्याला आपले हात स्थिर ठेवावे लागतात. एका बॉलिवूडच्या गाजलेल्या सीनेमातला सीन आठवला तर, हा सीन कसा शूट केलाय? हाच विचार तुमच्याही मनात येतो. 

Continues below advertisement

बॉलिवूडचा (Bollywood News) गाजलेला सिनेमा 'कबीर सिंह' (Kabir Singh Movie), या सीनेमातला एक सीन, ज्यामध्ये शाहीद कपूर (Shahid Kapoor) म्हणजेच, कबीर (Kabir Singh) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) म्हणजेच, प्रीती एका भरधाव बाईकवर एकमेकांना किस करतात. हा सीन कसा बरं शूट केला असेल? हा विचार प्रत्येकाच्याच मनात आला. अशातच शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्यावर शूट करण्यात आलेल्या सीनचा एक BTS हिडीओ (Kabir Singh BTS Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कबीर सिंहमध्ये बाईकवरचा शाहीद कपूर आणि कियारा अडवाणीचा किसिंग सीन

Continues below advertisement

सध्या ट्विटरवर 29 सेकंदांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या सीनमध्ये तुम्हाला शाहीद कपूर आणि कियारा अडवाणी दिसतायत. बाईक भरधाव वेगानं धावतेय. शाहीद कपूर बाईक चालवताना दिसतोय आणि मध्येच दोघे एकमेकांना किस करतात. फिल्ममधला हा सीन पाहून प्रेक्षक फारच एक्सायटेड झालेले. तसेच, हा सीन नेमका कसा शूट करण्यात आलेला? अशा चर्चाही रंगलेल्या. सध्या व्हायरल होणाऱ्या BTS व्हिडीओमध्ये दिसतंय की, सीन नेमका कसा शूट केलेला. 

कियारा आणि शाहीद ज्या बाईकवरुन जातायत, ती खरं तर रोडवर जातच नाहीये, ती एका ट्रॉलीला जोडण्यात आली आहे. ट्रॉलीवर कॅमेरामनसह इतरही अनेक लोक दिसत आहेत, जे सीन शूट करत आहेत. कलाकारांची सुरक्षितता राखत आणि कॅमेऱ्याचे अचूक अँगल मिळवत हा रोमँटिक सीन शूट करण्यात आलेवा. हा BTS व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना सिनेमातील अशा सीन्समागील मेहनत आणि तांत्रिक बाबींची नव्यानं जाणीव होत आहे.

'कबीर सिंह' सिनेमातला हा बिहाइंड-द-सीन्स (BTS) व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच मजेशीर आहेत. सिनेमातील रोमँटिक आणि थरारक सीन्समागे किती तांत्रिक तयारी असले, याची अनेकांना नव्यानं जाणीव झाली. एका युजरनं म्हटलंय की, "अरे, ही तर प्रेक्षकांची फसवणूकच आहे...". तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलंय की, "अशा सीन्समध्ये कॅमेरा ट्रिक असणार याची शंका होतीच, पण आज प्रत्यक्षात कसं शूटिंग होतं ते कळलं?" 

आणखी एका युजरनं या व्हिडीओखाली कॅमेरामनच्या मेहनतीचं कौतुक करत, "आज समजलं की, पडद्यामागे कॅमेरामन किती कष्ट घेतात..." अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सिनेमातील लोकप्रिय सीन्समागील वास्तव पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

दरम्यान, कबीर सिंह हा सिनेमा 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमातील हा बाईकवरील किसिंग सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

ABP माझाच्या बातम्या LIVE...