Social Media Influencer Neel Salekar Going To Be Father: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) नील साळेकर (Neel Salekar) म्हणजेच, सर्वांचा लाडका 'जस्ट नील थिंग्स' (Just Neel Things) नेहमीच चर्चेत असतो. त्याचे रिल्स सर्वांनाच आवडतात. त्याच्या रिल्सचा विषय नेहमीच आगळा-वेगळा आणि निखळ आनंद देणारा असतो. त्याच्या क्रिएटिव्ह आयडियाज नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. नील या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. अशातच नुकतीच त्यानं त्याच्या आगळ्या-वेगळ्या शैलीत, त्याच्या सब्स्क्रायबर्ससोबत एक गूड न्यूज शेअर केलीय. त्याच्या पोस्टवर सर्वांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
नीलनं शेअर केलेली गूड न्यूज त्याच्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टबाबत किंवा त्याच्या प्रोफेशनल लाईफबाबत नसून त्याच्या पर्सनल लाईफबाबत आहे. नील साळेकर आणि त्याची पत्नी श्रिया पुसळकर (Shriya_Pusalkar) यांच्या घरी लग्नाच्या तीन वर्षांनी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नीलनं सोशल मीडियावर एक क्लासी आणि क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करुन आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली. नीलच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.
नीलच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव
नीलनं सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नील आणि श्रिया समुद्राच्या लाटांमध्ये उभे असल्याचं दिसतंय. त्या दोघांच्या पायामध्ये चिमुकल्या पावलांचे ठसे दिसतायत. हा व्हिडिओ पोस्ट करत नीलनं कॅप्शनमध्ये एक सुर्यफल, बेबी बम्प आणि एक रेड हॉर्ट टाकलंय. नीलच्या या व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये सर्वांना या जोडप्याचं अभिनंदन केलंय. एका युजरनं लिहिलंय की, ""कुणीतरी येणारं ... खूपसारा आनंद घेऊन येणार..." तर, दुसऱ्या एकीनं कमेंट्समध्ये लिहिलंय की, "मी मावशी की आत्या?"
दरम्यान, नील साळेकर सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्याच्या अनोख्या कल्पना, क्रिएटिव्ह एडिट्स आणि हटके व्हिडीओमुळे त्यानं सोशल प्लॅटफॉर्मवर खास स्थान निर्माण केलं आहे. नीलची क्रिएटिव्हिटी सोशल मीडिया युजर्ससोबच सेलिब्रिटींनाही आवडते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही एकदा नीलचं क्रिएटिव्ह काम शेअर करत त्याचं कौतुक केलेलं. अरिजित सिंगनेही त्याच्या रील्सचं कौतुक केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :