Junior Artist Sanjeeb Singh Death News: 'आरंभी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ज्यूनिअर आर्टिस्ट संजीब सिंह यांचं दु:खद निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं  निधन झाले असल्याची माहिती आहे. 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे.  रविवारी टिव्ही सिरिअलचं शूट पूर्ण झाल्यानंतर घरी परतत असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यांचा जीव वाचवता आला नाही.   संजीब सिंह यांच्या निधनानंतर सिंह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) चे सेक्रेट्री अशोक दुबे यांनी याबाबत माहिती  दिली. 

Continues below advertisement

ज्यूनिअर आर्टिस्ट संजीब सिंह यांचं दु:खद निधन (Junior Artist Sanjeeb Singh Death on petrol pump)

मिळालेल्या माहितीनुसार, संजीब हे कोलकाता येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांचा परिवारही कोलकातामध्ये स्थायी असल्याची माहिती आहे.  अशोक दुबे यांनी सांगितलं की,  संजीब सिंह हे 'आरंभी' नावाच्या टीव्ही शोमध्ये काम करत होते.   या टीव्ही सिरिअलची शूटिंग साकीनाका परिसरातील एसजे स्टुडिओमध्ये सुरू होती. 

संजीबची शुटिंग दुपारी 2 वाजता सुरू होणार होती. रात्री 3 पर्यंत शूटिंग पूर्ण करायचे होते.   शूटिंगच्या दरम्यान, त्यांनी अनेकदा  प्रकृती बिघडली असल्याचं सांगितलं. तसेच काही वेळासाठी ब्रेक घेतला. रात्री पॅकअप झाल्यानंतर  ते आपल्या बाईकमधून परतत होते.  बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी ते पेट्रोल पंपावर थांबले होते. पेट्रोल पंपावर थांबल्यानंतर तिथे  संजीब यांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळले.  असं म्हटलं जात आहे की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. दरम्यान, संजीब सिंह यांना नेमकं काय झालं होतं?  याची माहिती त्यांचं शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर समोर येईल. माहितीनुसार, संजीब यांचं लग्न  झालं नव्हतं.  ते बहीण आणि भावासोबत राहत होते. 

Continues below advertisement

संजीब सिंह हे साधारण 30 वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत होते. अशोक दुबे यांनी सांगितलं की, संजीबची बहीण घटस्फोटीत असून, त्यांचा भाऊ हा कायम आजारी असतो.    संजीब सिंह यांचे पोस्टमार्टम  कूपर रुग्णालयात झाले असून, त्यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी कोलकातामध्ये पाठवले असल्याची माहिती आहे.  FWICEनेही संजीब सिंहच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?