Jolly LLB 3 Box Office Collection Day 10: 'जॉली LLB 3' (Jolly LLB 3) दररोज बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) नवेनवे रेकॉर्ड मोडत आहे. 10 दिवसांच्या कमाईसह, 'जॉली LLB 3'नं आठ चित्रपटांच्या लाईफटाईम बॉक्स ऑफिस कलेक्शनचा (Lifetime Box Office Collection) टप्पा ओलांडला आहे.

Continues below advertisement

कॉमेडी-कोर्टरूम ड्रामा 'जॉली LLB 3'नं बॉक्स ऑफिसवर त्याची धमाकेदार कमाई सुरूच ठेवली आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या जोडीनं पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांना प्रभावित केलंय. म्हणूनच 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला 'जॉली LLB 3' दहा दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची धमाकेदार कमाई करतोय. हा चित्रपट दररोज नवनवे रेकॉर्डही मोडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

'जॉली LLB 3' मोठ्या पडद्यावर येऊन 10 दिवस झालेत आणि चित्रपटानं आता 90 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या चित्रपटानं 10 दिवसांच्या कमाईत इतर आठ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या यादीत हिट, सुपरहिट आणि अगदी ब्लॉकबस्टर चित्रपटांचाही समावेश आहे. 

Continues below advertisement

'जॉली LLB 3'चं 10 दिवसांचं कलेक्शन 

  • 'जॉली LLB 3'ने सॅकनिल्क रिपोर्टनुसार, पहिल्याच आठवड्यात 74 कोटींचा गल्ला जमवला आहे. 
  • देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर, चित्रपटानं आठव्या दिवशी 3.75 कोटींची आणि नवव्या दिवशी  6.5 कोटी कमावले आहेत.
  • दहाव्या दिवशी (रात्री 10 वाजेपर्यंत) चित्रपटानं 5.83 कोटी कमावले आहेत.
  • यासह, भारतात चित्रपटाचं एकूण कलेक्शन आता  90.08 कोटींवर पोहोचलंय.

'जॉली LLB 3'नं मोडले 8 फिल्म्सचे रेकॉर्ड्स

  • 'जॉली LLB 3'नं  10 दिवसांत 90.08 कोटी कमाई करून सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाला मागे टाकलंय. या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं भारतात 88.72 कोटींचं कलेक्शन केलेलं.
  • अक्षय कुमार आणि अर्शद वारसी स्टारर या चित्रपटानं शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'रब ने बना दी जोडी' (85.49 कोटी) च्या लाईफटाईम कलेक्शनलाही मागे टाकलं आहे.
  • 'जॉली LLB 3'नं ऋषभ शेट्टीच्या ब्लॉकबस्टर 'कांतारा' (84.77 कोटी - हिंदी)ला मागे टाकलंय.
  • या चित्रपटानं 'जरा हटके जरा बचके' (88.35 कोटी), 'बदला' (88.53 कोटी), 'गब्बर इज बॅक' (87.54 कोटी), 'तेरी बातो में ऐसा उल्झा जिया' (85.16 कोटी), आणि 'पति पत्नी और वो' (8 कोटी) चे रेकॉर्ड मोडलेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Friday Box Office Collection: 'जॉली एलएलबी 3' सह सर्व चित्रपटांना 'ओजी'समोर घाम फुटला, शुक्रवारी कोणी किती केली कमाई केली? जाणून घ्या