john Abraham : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  जॉन अब्राहम (john Abraham)चा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना त्याचे चाहते नेहमीच पसंती देतात. जॉन त्याच्या फिटनेसमुळे तसेच अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकतो. अनेक वेळा जॉनचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात. मात्र काही दिवसांपूर्वी जॉनच्या एका फॅनने केलेल्या कृत्यामुळे जॉन भडकला आणि त्यानं त्या फॅनच्या कानशिलात लगावली. 
 
रिपोर्टनुसार, जॉन त्याच्या फोर्स 2  (force 2) या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये गेला होता. या इव्हेंट दरम्यान एक चाहता जॉनसोबत सेल्फी काढण्यासाठी जॉनच्या जवळ आला. त्यावेळी त्या चाहत्यानं जॉनचा टी-शर्ट पकडला आणि त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जॉनला राग आला. जॉनचा राग अनावर झाला आणि त्यावेळी जॉननं त्या चाहत्याच्या कानशिलात लगावली.  


जॉननं या घटनेनंतर एक स्टेटमेंट जाहीर केले. जॉनच्या स्पोकपर्सननं देखील माहिती दिली. त्यावेळी त्यानं सांगितलं, 'या गोष्टीला चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं. जॉन त्याच्या चाहत्याला कधीच हर्ट करणार नाही.'






जॉनचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये जॉनसोबतच दीपिका आणि शाहरूख देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच जॉनच्या अटॅक आणि एक व्हिलन रिटर्न्स या अगामी चित्रपटांची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 


संबंधित बातम्या


'द कपिल शर्मा शो'मुळे विराट कोहलीला तीन लाख रूपयांचा फटका; तुम्हाला माहितीये का किस्सा?


Sara Ali Khan : अरे देवा! मेकअप करत असतानाच साराच्या चेहऱ्यावजळ फुटला बल्ब! पाहा video


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha