'तर माझं आयुष्य नरक...' अमिताभ बच्चन आणि रेखाच्या अफेअरबाबतच्या बातम्यांवर दिली होती प्रतिक्रिया
Jaya Bachchan : 'तर माझं आयुष्य नरक...' अमिताभ बच्चन आणि रेखाच्या अफेअरबाबतच्या बातम्यांवर दिली होती प्रतिक्रिया

Jaya Bachchan : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि खासदार जया बच्चन (ज्येष्ठ अभिनेत्री) (Jaya Bachchan) यांचा विवाह होऊन 50 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलाय. आज, म्हणजेच 3 जून रोजी, ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बी यांनी अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यासोबत लव्ह मॅरेज केलं होतं. तरीही, लग्नाच्या काही वर्षांनंतरच त्यांचे मन अभिनेत्री रेखा (Rakha) यांच्याकडे ओढले गेले, अशा चर्चा रंगल्या होत्या. असं म्हटलं जातं की, दोघांनी अनेक वर्षे गुपचूप एकमेकांना डेट केलं होतं. या चर्चांवर जया बच्चन यांनी एकदा उघडपणे बोलत एक वक्तव्य केलं होतं.
"जर मी हे सगळं गंभीरपणे घेतलं असतं, तर माझं आयुष्य अजूनपर्यंत नरकासारखं झालं असतं"
2008 साली ‘पीपल’ मॅगझिनला दिलेल्या एका मुलाखतीत जया बच्चन यांनी या चर्चांवर भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "जर असं काही खरंच घडलं असतं, तर ते आज कुठेतरी दुसरीकडे असते, नाही का?" जया बच्चन म्हणाल्या, लोकांनी त्यांना (अमिताभ आणि रेखा) स्क्रिनवर एक जोडी म्हणून खूप पसंत केलं, आणि ते ठीक आहे. पण मिडियाने प्रत्येक अभिनेत्रीबरोबर अमितजींचं नाव जोडण्याचा प्रयत्न केला. त्या पुढे म्हणाल्या, "जर मी हे सगळं गंभीरपणे घेतलं असतं, तर माझं आयुष्य अजूनपर्यंत नरकासारखं झालं असतं. आम्ही दोघं खूप सख्त स्वभावाचे आहोत."
अशा परिस्थितीतही जर तो माणूस निघून जातो, तर तो कधीच तुमचा नव्हता
जया बच्चन यांनी हेही स्पष्ट केलं की, "जर ते (अमिताभ) रेखासोबत काम करतात, तर त्यात मला काहीच हरकत नाही." मात्र, अफेअरच्या चर्चांनंतर अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत काम करणं थांबवलं होतं. या मुलाखतीत जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल असंही म्हटलं होतं, "तुमच्याकडे विश्वास असला पाहिजे. मी अशा माणसाशी आणि अशा कुटुंबाशी लग्न केलंय, जे कमिटमेंटवर विश्वास ठेवतं. अशा परिस्थितीतही जर तो माणूस निघून जातो, तर तो कधीच तुमचा नव्हता." अमिताभ आणि जया यांच्या लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली – श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन. अभिषेक सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























