Rekha Took Oath As Rajya Sabha Member Jaya Bachchan Reaction: जया बच्चन (Jaya Bachchan) आणि रेखा (Rekha) या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, ज्यांनी 70 आणि 80 चं दशक गाजवलं. पण, गेल्या काही वर्षांत त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. रेखा आणि अमिताभ याच्याबाबत बॉलिवूड जगतात नेहमीच चर्चा रंगलेल्या असतात. आजही रेखा आणि बिग बींची कथित प्रेमकहाणी चाहत्यांकडून वारंवार चर्चेत असते. जेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी एकत्र सुपरहिट सिनेमे दिले, तेव्हापासूनच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलेलं. त्यावेळी बिग बी विवाहित होते. त्यानं जया बच्चन यांच्याशी लग्नगाठ बांधलेली. त्यामुळेच अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबाबत बोलताना 'अफेअर' असा उल्लेख केला जातो. पण, दोघांनीही कधीच याबाबत कोणत्याच गोष्टीवर कधीच भाष्य केलेलं नाही. 

जया बच्चन आणि रेखा सार्वजनिकरित्या एकमेकांना अगदी आदरानं, प्रेमानं भेटताना दिसतात. पण कित्येकदा दोघींनी एकमेकींपासून अंतर राखल्याचंही पाहायला मिळालं आहे. 2012 मध्ये संसदेत रेखाच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान असंच काहीसं घडलं. ही घटना तेव्हाची आहे, जेव्हा रेखा यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली होती. इकडे रेखा शपथ घेत होत्या, पण कॅमेरा मात्र जया बच्चन यांच्यावर खिळला होता. त्यावेळी जया बच्चन यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता अगदी स्पष्टपणे दिसत होती. 

रेखा यांच्या शपथविधीवेळी सभागृहात का झालेला गोंधळ? 

रेखा हातात कागद धरुन शपथ घेत होत्या, तर जया बच्चन त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता लपवत होत्या. दुसरीकडे, रेखा यांनी प्रत्येक वाक उच्चारल्यानंतर जया बच्चन यांच्या रिअॅक्शन टिपण्यासाठी कॅमेरे त्यांच्यावर खिळले होते. जया हनुवटीवर हात ठेवून रेखा यांच्याकडे एकटक पाहत होत्या.

मिडिया रिपोर्टनुसार, ज्यावेळी रेखा राज्यसभेच्या सदस्य म्हणून शपथ घेत होत्या, त्यावेळ सभागृहात गोंधळ झाला होता. कारण, कित्येक खासदारांनी रेखा शपथ घेताना जया बच्चन यांच्यावर सतत कॅमेरा नेल्याप्रकरणी तक्रार केली होती. 

हेडलाईन्स टुडेशी बोलताना खासदार माया सिंह म्हणाल्या होत्या की, राज्यसभा टीव्हीवरील जया बच्चन यांच्यावर सातत्यानं खिळलेले कॅमेरे, हे अत्यंत चुकीचं आहे. दरम्यान, संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला या घटनेबद्दल बोलताना म्हणालेले की, "काही सदस्यांनी अध्यक्षांसमोर हा मुद्दा उपस्थित केला की, जेव्हा रेखा शपथ घेत होत्या, तेव्हा सर्व कॅमेरे जया बच्चन यांच्यावर होते. त्यांना सांगण्यात आलेलं की, हे प्रक्षेपण दूरदर्शन करत असल्यानं, जी काही दृश्य दाखवली जात होती, ती राज्यसभा टीव्हीवर दाखवली जात होती."

दरम्यान, त्यावेळी कित्येक मिडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं गेलेलं की, रेखा यांच्या शेजारी बसण्याची जागा मिळाल्यानंतर जया बच्चन यांनी वरिष्ठ सभागृहात स्वतःची जागा बदलून घेतलेली. जया बच्चन रेखा यांच्यासोबत एकाच चौकटीत अडकू इच्छित नव्हत्या. रेखाच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान तिच्या नाराजीच्या वृत्तांवर जया बच्चन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

...तर ते प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त खळबळजनक असेल : जया बच्चन 

पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांना विचारण्यात आलेलं की, रेखा आणि अमिताभ आता एकत्र काम करत नाहीत, याचं कारण तुम्ही आहात का? यावर जया बच्चन म्हणाल्या की, "जर त्यांनी एकत्र काम केलं तर ते प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त खळबळजनक असेल..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधली अभिनेत्री सहेर बंबा कोण? सनी देओलशी क्लोज कनेक्शन