Javed Akhtar on Pahalgam attack : आता आर नाही तर पारची लढाई लढण्याची वेळी आलीये, असं ज्येष्ठ सिनेलेखक जावेद अख्तर यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam attack) 26 भारतीयांना जीव गमावलाय, त्यानंतर जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ते महाराष्ट्र दिना दिवशी आयोजित करण्यात आल्यानंतर गौरवशाली महाराष्ट्र 2025 या कार्यक्रमात बोलत होते.

पहलगाम घटना दुर्दैवी आहे, आपण ती विसरली नाही पाहिजे : जावेद अख्तर

जावेद अख्तर म्हणाले, पहलगाम घटना दुर्दैवी आहे आपण ती विसरली नाही पाहिजे. मी लाहोरला गेलो होतो एका साहित्यिक कार्यक्रमाला. एक महिला मला तिथ म्हणाली की आम्ही तुमच चांगलं स्वागत केलं. आम्ही काय तुमच्यावर गोळ्या झाडतो का? त्यावेळी मी महिलेला उत्तर दिलं की मी मुंबईला जळताना पाहिलं आहे ज्यांनी ते केलं ते या देशात फिरत आहेत. ते काय इटली वरून नव्हतां आला. तुमच्या देशातून जे जे कलाकार आले त्यांना आम्ही डोक्यावर घेतलं अनेक कलाकार आहे त्यांना आम्ही डोक्यावर घेतलं मात्र तुमच्याकडून तसं होतं नाही. मी हे बोलल्या नंतर वातावरण तंग झालं होतं. या प्रकरणाची प्रतिक्रिया येईपर्यंत मी भारतात आलो होतो. आज जो हल्ला केला ते पाकिस्तानी नसतील जर्मनी वरून आले असतील असं आहे का? 

99 टक्के काश्मिरी हिंदुस्थान सोबत प्रामाणिक आहेत : जावेद अख्तर

पुढे बोलतान जावेद अख्तर म्हणाले, जे आपल्या लोकांना आपलं म्हणत नाहीत त्यांच्या बाबत आपण काय बोलणार? काश्मिरी हिंदुस्तानी आहेत. 99 टक्के काश्मिरी हिंदुस्थान सोबत प्रामाणिक आहेत. आत्ता मसूरी मधे ज्या काश्मिरी मुलाना मारलं ते पाकिस्तानी आहेत का? ते हिंदुस्तानी आहेत. काश्मिरी आहेत. आपण त्यांना का वेगळं समजायचं? असा सवालही जावेद अख्तर यांनी व्यक्त केलाय. 

मुंबईत मेहनत करत असाल तर तुम्हाला यश मिळत. 19 व्या वर्षी मी मुंबईत आलो होतो. आलो त्यावेळी 27 पैसे होते. आज जे काही माझ्याकडे आहे ते फक्त या मुंबईमुळे मला मिळाल आहे. मी 7 जन्म ह्या शहराचे उपकार विसरू शकत नाही. ज्या बॉम्बे सेंट्रलला आलो त्यावेळी त्याच ठिकाणी झाडू काढण्याचं काम केलं होतं. आज दिवस बदलले आहेत. महाराष्ट्राच हृदय हे समुद्रासारखं विशाल आहे, असंही जावेद अख्तर म्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

उल्लू अ‍ॅपवर एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट शो' अश्लिलतेचा कळस, तात्काळ बंदी घाला, चित्रा वाघ यांची मागणी

Ashi Hi Banwa Banwi : मार्केट मध्ये आली आहे सत्तर रुपयांची नवीन नोट; नेमकं प्रकरण काय?