Jaqueline Fernandez: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं (Jaqueline Fernandez) मानवतेचं उदाहरण घालून सर्वांची मनं जिंकली आहेत. अलिकडेच जॅकलिननं एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त असलेल्या बाळाची भेट घेतली. तिनं त्या बाळासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत काही वेळही घालवला. तर, बाळाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही स्विकारली. अभिनेत्रीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बाळाशी खेळताना दिसतेय.                                     

Continues below advertisement

भिवंडीतील एका दुर्मिळ आजारान ग्रस्त असलेल्या लहानग्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देवदूत ठरली आहे. हायड्रोसिफलसग्रस्त बाळाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च जॅकलिननं उचलला आहे.                                  

भिवंडीतील नासिर शेख यांचा 11 महिन्यांचा मुलगा मोहम्मद मेहबूब शेख जन्मापासून हायड्रोसिफलस या गंभीर आजारानं ग्रस्त आहे. या आजारात डोक्यात पाणी साचत असल्यानं डोक्याचा आकार असामान्यरीत्या वाढतो. सध्या या बाळाच्या डोक्याचं वजन तब्बल 10 ते 12 किलो आहे.                                     

Continues below advertisement

मजुरी करून पाच मुलांचं संगोपन करणारे नासिर शेख यांना उपचाराचा 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च न परवडणारा आहे. अशा कठीण परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते हुसैन मंसुरी यांनी ही बाब समाजासमोर आणली. ही हृदयस्पर्शी गोष्ट बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या कानावर गेल्यानंतर तिनं स्वतः पुढाकार घेत देवदूताप्रमाणे मदतीचा हात दिला. जॅकलिननं मोहम्मद मेहबूब शेखच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्विकारली.

सध्या या लहानग्याचा उपचार मुंबईतील लिलावती रुग्णालयात सुरू आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन बाळाची भेट घेतली. तिच्या मायेनं आणि आधारानं नासिर शेख यांचं संपूर्ण कुटुंब कृतज्ञ झालं आहे. स्थानिकांनी जॅकलिन फर्नांडिसच्या या मदतीचं मनापासून कौतुक केलं. तसेच, "अभिनेत्रीच्या मदतीमुळे मुलगा लवकर बरा होईल...", अशी आशाही व्यक्त केली.