Janhvi Kapoor Manforce Condom Advertisement: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांची कमाई नेहमीच चर्चेचा विषय ठरते. बॉलिवूडमधील (Bollywood Stars) अनेक स्टार्स चित्रपटांपेक्षा ब्रँड एंडोर्समेंटमधून जास्त पैसे कमवतात. अनेक सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या ब्रँडसोबत कोलॅब केलं आहे. अशातच आता देशातील सुप्रसिद्ध कंपनी मॅनफोर्सच्या (Manforce) संस्थापकांनी कंडोम आणि प्रेग्नेंसी टेस्ट किटचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या पहिल्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल बोलले आहे.


कंडोम कंपनी मॅनफोर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव जुनेजा यांनी अलीकडेच त्यांच्या कंपनीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरबद्दल सांगितलं. या काळात, त्यांनी काही स्टार्सची नावं घेतली, ज्यांच्याशी त्यांच्या कंपनीसाठी संपर्क साधण्याची त्यांची इच्छा होती, पण स्टार्सनी ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला.


राजीव जुनेजा यांच्या मते, कंडोमच्या जाहिरातीसाठी सर्वोत्तम अभिनेता कोण असू शकतो? या प्रश्नावर ते म्हणाले की, "कंडोमसाठी? किंवा इतर कशासाठीही? जान्हवी कपूर एकदम परफेक्ट आहे, ती बेस्ट चॉईस आहे. यानंतर, राजीवनं रणबीर कपूर आणि लक्ष्य लालवानी यांची नावंही यादीत जोडली. यादरम्यान, राजीव यांनी खुलासा केला की, जान्हवी आणि रणबीरनं आधीच कंडोम कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होण्यास नकार दिला आहे.


राजीव यांनी पुढे बोलताना प्रेगा न्यूज प्रेग्नन्सी टेस्ट किटबद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं की, सध्या त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर अनुष्का शर्मा आहे, जी योग्य निवड आहे. जर त्यांना ब्रँडसाठी पुढची अभिनेत्री निवडायची असेल तर, दीपिका पदुकोण ही एक चांगली निवड असेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mahira Sharma And Mohammed Siraj Dating Rumors: माहिरा शर्मा, मोहम्मद सिराज रिलेशनमध्ये, लवकरच लग्नाचा बार उडवणार?