Janhavi Killekar Video Suraj Chavan Sanjana: 'आता कन्फर्म सांगायला हरकत नाही..' जान्हवी किल्लेकरनं भरली संजनाची चोरओटी! Video शेअर करत म्हणाली..
आता सुरजची पत्नी संजना गरोदर असल्यानं तिने चोरओटी भरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Janhavi Killekar Video On Suraj Chavan Sanjana: अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि सुरज चव्हाणमध्ये असलेली मैत्री जिव्हाळ्याचे संबंध आता सगळ्यांनाच माहित आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवी किल्लेेकर सुरज चव्हाणच्या लग्नात मिरवताना दिसली. त्याचं नवीन घर झालं तेव्हाही आवर्जून त्याच्याकडे मदतीसाठी गेली होती. आता सुरजची पत्नी संजना गरोदर असल्यानं तिने चोरओटी भरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुरजची मानलेली बहीण जान्हवी किल्लेकर आता आत्या होणार आहे. त्यामुळे, संजनाची ओटी भरतानाचा video तिने शेअर केलाय. त्याची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
या व्हिडिओखाली तिने लिहिलं 'मार्च महिन्यात भरलेल्या चोर ओटी चा व्हिडिओ आत्ता शेअर करते आहे. कारण आत्ता कन्फर्म सांगायला काही हरकत नाही की, आपला सुरज लवकरच बाबा होणारे ... ' असं कॅप्शन लिहीत तिने सुरज आणि संजनाच्या गुड न्यूजचं कन्फर्मेशनच दिलं. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. जान्हवी फक्त बोलत नाही, तर करूनही दाखवते असं चाहते म्हणत आहेत.
जान्हवी किल्लेकरने दिलं सुरजच्या गुडन्यूजचं कन्फर्मेशन
जान्हवी किल्लेकरने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सुरज आणि संजना यांचा पाहुणचार करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस विजेता सुरज चव्हाण बाबा होणार असल्याच्या चर्चा होत्या.दोघांनीही अधिकृत काही म्हटलं नसलं तरी सुरजच्या पत्नीचे बेबी बम्प सर्वांना दिसले आणि चर्चांना उधाण आलेलं.आता जान्हवी किल्लेकरने चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम करत सुरज आणि संजनाची गुड न्यूज कन्फर्म असल्याचं चाहत्यांना सांगितलं. जान्हवीने संजनाची ओटी भरली. बाबा होणार असल्याने सुरजलाही मोठ्या मायेने जवळ घेतलं. या व्हिडिओच्या मागे तिने सुंदर गाणं लावत दोघांना आहेर केल्याचे दिसलं. चोर ओटी ही गरोदरपणाच्या तीन महिने पूर्ण झाल्यानंतर भरली जाते. त्यामुळे 'मार्च महिन्यात चोर ओटी भरली होती, तो व्हिडिओ मी आता शेअर करते आहे. कारण आता कन्फर्म सांगायला काही हरकत नाही.आपला सुरज लवकरच बाबा होणारे ..' असं तिने या कॅप्शनवर लिहिलं
View this post on Instagram
सुरज चव्हाण आणि संजना गोफणे यांचं 2025 च्या नोव्हेंबरमध्ये बारामतीला लग्न झालेलं.संजना ही सुरजची मामे बहीण आहे. दोघांचं लव्ह मॅरेज असून त्यांच्या लग्नाला जानवी किल्लेकर, धनंजय पवार, पॅडी या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच काही राजकीय मान्यवरही उपस्थित होते.






















