Janhavi Killekar on Narsapur Pune Crime: पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. साडेतीन वर्षांच्या मुलीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून तिला ठार मारल्याची घटना 1 मे रोजी घडली होती. (Narsapur Crime) या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून संतप्त पडसाद उमटत आहेत. उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या आजोळी गेलेल्या या मुलीला आरोपीने गोठ्यात वासरू दाखवायला नेतो, असं सांगून त्याच्यासोबत नेले होते. तिथेच त्याने तिच्यावर अत्याचार केले, नंतर तिला ठार मारले. तळपायाची आग मस्तकात जाणारा हा प्रकार लक्षात येताच राज्यभरातून संतापाची लाट उसळली. या प्रकरणावर कलासृष्टीतूनही अनेक कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने ( Janhavi Killekar)  नुकताच एक व्हिडिओ करत या प्रकरणावर संताप व्यक्त केलाय. 

काय म्हणाली जान्हवी किल्लेकर ? (Janhavi Killekar)

जान्हवी म्हणाली ' नसरापुर मध्ये एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तीही एका 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने हे सगळं घाणेरडे कृत्य केलं. मला हे कळत नाहीये. एवढं सगळं आपल्याला माहित असून, आरोपी सापडला असूनही त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी एवढा वेळ का लागतोय ? मला तर असं वाटतं ना, त्या म्हाताऱ्याला पकडून त्याला सगळ्या माणसांनी भर चौकात कापून टाकलं पाहिजे, जाळून टाकलं पाहिजे. त्याची सुद्धा त्याची घाणेरड्या पद्धतीने हत्या करण्यात आली पाहिजे. तरच हे सगळं कुठेतरी थांबेल. आज ही पहिली केस नाही, जे महाराष्ट्रात घडतेय . अनेक लहान मुली अशा घाणेरड्या कृत्याच्या बळी पडल्या आहेत."

'माझ्या मुलालाही मी ' बॅड टच झाला का ?' विचारते..'

ती पुढे म्हणाली ' त लहान मुलीला काय वाटत असेल, काय फील होत असेल. तिच्यासोबत काय घडतय याचीही तिला कल्पना नसेल. तिची हत्या करून टाकण्यात येते. तिच्या आईला काय वाटत असेल ? मी पण एक आई आहे, मलाही एक मुलगा आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती का, मला मुलगा असूनही मला त्याला बाहेर पाठवण्याची भीती वाटते . तो शाळेतून आला, खेळून आला, तो कुठूनही आला तरी मी त्याला विचारते ' बाबू तुला कोणी बॅड टच नाही केलं ना ?' मला मुलगा असून पण मी एवढी काळजी घेते, त्या मुलीच्या आईला काय फील होत असेल. या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबला पाहिजेत. 

जान्हवी म्हणाली,'या सगळ्याची दखल सरकारने कुठेतरी घेतली पाहिजे. एक आई म्हणून मी विनंती करते की या गोष्टी थांबायला हव्यात. थांबल्याच पाहिजेत. तर एक स्त्री आणि एक मुलगी स्थानिक समाधानाने या समाजात वावरू शकेल.  कृपया त्या नराधमाला यावेळी तरी अशी शिक्षा द्या अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत ही गोष्ट लक्षात ठेवेल. आणि अशी गोष्ट करण्याआधी 100 वेळा विचार करेल. '  असं जान्हवी किल्लेकरने म्हटलं .

हेही वाचा:

Ankita Walawalkar on Nasrapur Crime: 'त्याला जेलमध्ये पोसत बसू नका..' नसरापुरच्या घटनेवर अंकिता वालावलकर प्रचंड संतापली, सरकारवरही ताशेरे, म्हणाली ..