एक्स्प्लोर

Jai Jai Swami Samartha: तिकडे 'देऊळ बंद 2' च्या पोस्टरची चर्चा, इकडे 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतही मोठी घडामोड; अंधविश्वासाचा बागुलबुवा स्वामी मोडून काढणार

या विशेष टप्प्यावर कथा एका अशा निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे, जिथे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.

Marathi Serial: एकीकडे बहुप्रतीक्षित देऊळ बंद 2 या चित्रपटाची चर्चा आहे.  'देऊळ बंद 2' (Deool Band 2) च्या प्रदर्शनाची 21 मे 2026 ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली आणि त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, मराठी मालिकांच्या विश्वात एक अभूतपूर्व पल्ला गाठत, कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ (Jai Jai Swami Samartha) ही लोकप्रिय मालिका आता 1800 भाग आणि तब्बल पाच वर्षांचा देदीप्यमान प्रवास पूर्ण करत आहे. या विशेष टप्प्यावर कथा एका अशा निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे, जिथे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. “आज्ञेविना काळ ना नेई तयाला… परलोकीही ना भीति तयाला…” या प्रभावी कथासूत्राने सजलेली ही गाथा स्वामींच्या दिव्य लीलांमधून भक्तीची अढळ शक्ती दाखवत आली आहे. मात्र आता या श्रद्धेच्या विश्वात मार्तंड, जो स्वतःला दैवी स्वरूपात सादर करत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतो. स्वामी त्याला कशी अद्दल घडवणार ? स्वामी भक्तांच्या मनातील श्रध्दा दृढ व्हावी ह्यासाठी काय काय घडवून आणणार? हे बघणे रंजक असणार आहे. (Marathi Serial)

स्वामी रुजवतायत भीतीवर मात करणारी खरी श्रद्धा

मार्तंड आपल्या चतुराईने, भीती आणि अंधविश्वास यांचा आधार घेत गावकऱ्यांना आपल्या प्रभावाखाली आणताना दिसतो. त्याच्या चमत्कारांच्या आड लपलेला हेतू आणि बनावट अध्यात्मिकतेचा खेळ हळूहळू पसरत जातो. तो स्वामींच्या प्रभावालाच आव्हान देत, त्यांच्या स्थानावर डोळा ठेवतो. पण दुसरीकडे, स्वामी शांत, संयमी आणि गूढ पद्धतीने या सगळ्या घडामोडींना सामोरे जात आहेत. ते थेट संघर्ष न करता, आपल्या लीलांमधून आणि सूचक इशाऱ्यांमधून सत्याची जाणीव करून देत आहेत. जिथे मार्तंड भ्रम निर्माण करतो, तिथे स्वामी भीतीवर मात करणारी खरी श्रद्धा रुजवत आहेत आणि हाच या महासंग्रामाचा केंद्रबिंदू ठरतो.

स्वामींचं सत्य श्रेष्ठ ठरेल की मार्तंडचा भ्रम?

या सगळ्या घडामोडींमध्ये अंबादाससारख्या डोळस भक्ताची अढळ श्रद्धा आणि रेणुकासारख्या आईची भावनिक घालमेल कथा अधिकच हृदयस्पर्शी बनवते. एकीकडे भक्तीची परीक्षा, तर दुसरीकडे भ्रमाचा प्रभाव या दोन्हींच्या संघर्षात प्रेक्षकांना सतत विचार करायला भाग पाडणारा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. १८०० भागांच्या या टप्प्यावर मालिका प्रेक्षकांना एका नव्या उंचीवर घेऊन जात आहे, जिथे प्रश्न फक्त एवढाच स्वामींचं सत्य श्रेष्ठ ठरेल की मार्तंडचा भ्रम प्रभावी ठरेल? याचं उत्तर उलगडत जाणार आहे, उत्कंठा कायम ठेवत. जाणून घेण्यासाठी पहा जय जय स्वामी समर्थ दररोज संध्या ६.३० आणि दुपारी २.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band 2: प्रविण तरडेंनी लिहिलेला 'तो ' डायलॉग घेण्यास मोहन जोशींनी दिलेला स्पष्ट नकार; देऊळ बंद 2 च्या वेळेस स्वतःच म्हणाले ..
प्रविण तरडेंनी लिहिलेला 'तो ' डायलॉग घेण्यास मोहन जोशींनी दिलेला स्पष्ट नकार; देऊळ बंद 2 च्या वेळेस स्वतःच म्हणाले ..
Ankita Walawalkar Cannes: 'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
Raja Shivaji Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठड्यातही 'राजा शिवाजी'चा डंका, 100 कोटींच्या कमाईपासून किती पावलं दूर ?
बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठड्यातही 'राजा शिवाजी'चा डंका, 100 कोटींच्या कमाईपासून किती पावलं दूर ?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Ankita Walawalkar Cannes: 'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
PM Modi Netherlands Visit: पंतप्रधान मोदींच्या नेदरलँडमध्ये दौऱ्यात सेमीकंडक्टरसंदर्भात ऐतिहासिक करारा; भरातला 100 वर्षांनंतर परत दिला 11व्या शतकातील अमूल्य वारसा
पंतप्रधान मोदींच्या नेदरलँडमध्ये दौऱ्यात सेमीकंडक्टरसंदर्भात ऐतिहासिक करारा; 11व्या शतकातील अमूल्य वारसाही भारतात परतणार
Embed widget