Jai jai Swami Samarth: कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या भूमिकेत स्वामी समर्थांची 5 वर्षांपासून भूमिका साकारणारा अभिनेते अक्षय मुडावदकर यांनी अलीकडेच मालिकेचा निरोप घेतला. तब्बल पाच वर्ष स्वामींची भूमिका साकारल्यानंतर त्यांनी या भूमिकेला निरोप दिलाय. मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. गेल्या पाच वर्षांपासून आत्तापर्यंत 1700 भाग या मालिकेने पूर्ण केले आहेत. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रेक्षकवर्ग असणाऱ्या या मालिकेत सध्या महत्त्वाचं बदल करण्यात आलाय. पण या बदलामुळे पाच वर्षांनंतर स्वामींच्या भूमिकेतून अभिनेता अक्षयच्या Exit ने चाहते ही भावनिक होताना दिसत आहेत.
जय जय स्वामी समर्थ या मालिकेत महानिर्वाणाचा अध्याय सुरू आहे. आता स्वामी समर्थांच्या भूमिकेत ज्येष्ठ कलाकाराची निवड करण्यात आलीय. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून स्वामींची भूमिका साकारण्याची संधी मिळालेला अभिनेता अक्षयने व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांचे आणि निर्मात्यांचे आभार मानले आहेत. या व्हिडिओवर चाहतांनी पोस्ट करत गेल्या पाच वर्षांपासून साकारलेल्या स्वामींच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे.
काय म्हणाला अभिनेता अक्षय मुडावदकर?
स्वामींच्या भूमिकेला निरोप देताना अभिनेता म्हणाला ' नमस्कार. गेली पाच वर्ष आणि 1750 हून अधिक भाग मला स्वामींची भूमिका साकारायची संधी मिळाली,त्यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो.हा स्वामींचा आशीर्वाद आहे असं मी मानतो.त्याचबरोबर तुम्हा रसिक प्रेक्षकांनी पाच वर्ष मला भरभरून प्रेम दिलं,त्यासाठी मी तुमचा कायम ऋणी असेल.पंजाब पद्धतीने एखादा प्रवास सुरुवात होतो तो कुठेतरी थांबणार हे निश्चित असतं. त्यामुळे माझ्या स्वामींच्या भूमिकेचा प्रवास इथपर्यंतच होत . हा प्रवास जरी इथे थांबत असला तरी ही भूमिका आणि हा प्रवास कायम माझ्यासोबत राहणार आहे. भविष्यातही मी विविध भूमिका केल्या तरी स्वामींची भूमिका ही माझ्यासाठी अग्रस्थानी असेल. मी तुम्हाला रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. कलर्स मराठी आणि निर्मात्यांचे आभार मानतो. कारण त्यांनी संधी दिली त्यामुळे मलाही भूमिका साकारता आली. यापुढे आपली भेट मालिकेत होणार नसली तरी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय आहे. आपण तिथे भेटूया. सर्वांचे मनापासून आभार. जय स्वामी समर्थ ' असे तो म्हणाला.
प्रेक्षकांचं भरभरून कौतुक
या व्हिडिओ खाली प्रेक्षकांनी अभिनेता अक्षय मुडावदकरचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांना त्याची मालिकेतील एक्झिट अजूनही पचवता येत नाहीये. अनेकांनी 'तुम्ही मालिकेत परत या ' तुमच्याशिवाय स्वामींचा रोल अपूर्ण वाटतो. 'तुमचा आवाज स्वामींना बघायला मजा येत होती ' अशा अनेक कमेंट्स करत हजारो प्रेक्षकांनी अक्षयच्या या व्हिडिओवर मालिकेतील त्याच्या कामाविषयी कौतुक केले आहे.
