Colors Marathi: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ सध्या एका रहस्यमय आणि उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. गंगाच्या आयुष्याभोवती फिरणारं गूढ आता अधिक गडद होत चाललं असून, तिच्या लहानपणापासून पडणाऱ्या भयानक स्वप्नामागचं सत्य काय आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. लहानपणापासून सतावत असलेलं एक भयानक स्वप्न - हे स्वप्न आहे की संकेत? त्यामागचं गूढ आता उलगडण्याच्या मार्गावर आहे. स्वामी स्थानावर सुंदरा, कपिला आणि सेवेकरी कोडी घालत असताना स्वामी स्वतः एक वेगळंच कोडं समोर ठेवतात आणि काही बिया हवेत स्वतःहून लटकवण्याचं अशक्य वाटणारं रहस्य आपल्या दिव्य शक्तीने उलगडून दाखवतात. त्याचवेळी स्वामी संकेत देतात की, गंगाच्या आयुष्यातील मोठं कोडंही आता सुटण्याची वेळ आली आहे.

Continues below advertisement

गंगाला वारंवार जाळण्याचं स्वप्न का पडतं? 

दुसरीकडे, गंगा पुन्हा एकदा त्याच भीषण स्वप्नाने हादरते. कुणीतरी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं हे स्वप्न तिला लहानपणापासून पडत आलं आहे. या स्वप्नामागचं कारण काय, ती व्यक्ती कोण आणि प्रत्येक वेळी स्वप्नात स्वतःचंच रूप का दिसतं, या प्रश्नांनी गंगा अधिकच अस्वस्थ झाली आहे. गंगाच्या स्वप्नामागचं रहस्य काय आहे? अक्कलकोट आणि खंडोबाच्या मंदिराचा तिच्या आयुष्याशी काय संबंध आहे? स्वामी गंगाला कोणत्या सत्याकडे घेऊन जात आहेत? गंगाच्या आयुष्यातलं हे रहस्यमय कोडं तिला अक्कलकोटला स्वामींपर्यंत घेऊन येणार का? नक्की काय घडणार? पहा, ‘जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा’, दररोज रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट म्हणजे साधूच्या वेशातले स्वामी गंगा आणि यामिनीसमोर येतात. “कोडं सोडवणार, भविष्य घडवणार,” असं म्हणत ते गंगाच्या प्रश्नांची उत्तरं तिच्या आई-वडिलांकडे असल्याचं सांगतात. त्यामुळे राधा आणि माधव गंगापासून कोणतं मोठं सत्य लपवत आहेत, याबाबतही संशय निर्माण झाला आहे. 

Continues below advertisement