Jahnavi Killekar dance video : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar dance video) हिने ‘चांद मातला’ या गाजलेल्या मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तिच्या या डान्स व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. यावेळी (Jahnavi Killekar dance video) जान्हवी किल्लेकरचा वेस्टर्न लूक पाहायला मिळालाय. तिच्या डान्स मुव्ह्ज आणि चेहऱ्यावरील हावभाव एकदम कमाल असून तिने (Jahnavi Killekar dance video) प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जान्हवीचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही पहिल्यांदाच सन मराठीवर झळकली असून या स्टेजवर तिने हा डान्स केला आहे. सन मराठीवर 27 जुलै रविवारी दुपारी 1 आणि रात्री 9 वाजेपर्यंत 'मेळा मनोरंजनाचा' हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात जान्हवी किल्लेकरच्या खास अदा पाहायला मिळणार आहेत. 

जान्हवी किल्लेकर हिचं नाव अलीकडच्या काळात सिनेसृष्टीत विशेष चर्चेत आलं आहे. मराठीतील अनेक मालिकांमध्ये तिने खलनायिका म्हणून भूमिका साकारल्या आहेत. आता जान्हवी किल्लेकर  कलर्स मराठी वरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 

मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिचा जन्म 11 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेली असून, "कोळीवाडा झिंगला" (2019) या चित्रपटातून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. यानंतर "श्री गुरुदेव दत्त" या मालिकेत लक्ष्मी देवीची भूमिका साकारत तिने छोट्या पडद्यावर आपली वेगळी छाप पाडली. 2022 साली आलेल्या "भाग्य दिले तू मला" या मालिकेमुळे तिला अधिक ओळख मिळाली. या मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे ती चर्चेत राहिली. नुकताच प्रदर्शित झालेला "मिरांडा वॉर्निंग" (2025) हा तिचा महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे.

जान्हवीने मराठी मालिकांबरोबरच अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही अभिनय केला आहे. "नारळी पौर्णिमा" आणि "गोल्डची हळद" या म्युझिक व्हिडिओंमधून तिने तिचं  नृत्यकौशल्यही दाखवलं आहे. याशिवाय, जान्हवीने अलीकडेच बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सहभाग घेतला होता. तिच्या बहुपेडी प्रतिभेमुळे ती मराठी मनोरंजनसृष्टीत उगम पावणाऱ्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : म्हातारी व्हायलीस लग्न कर, नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग, झरीन खानचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाली...

4 तास 19 मिनीटांच्या सिनेमात 33 अभिनेते, पण चित्रपट फ्लॉप ठरला अन् अनेक कलाकारांचं करियर बरबाद झालं