एक्स्प्लोर

Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि रिलस्टार प्रणाली सूर्यवंशी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, त्यावर अभिनेते किरण माने यांनी पोस्ट केलीय.

Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: मराठी अभिनेते (Marathi Actor) आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) नेहमीच आपल्या परखड आणि रोखठोक भूमिकांसाठी ओळखले जातात. सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर ते आपलं मत मांडत असतात. अशातच, नुकताच राज्यभरात दहीहंडी (Dahi Handi 2026) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. कित्येक उत्सवांदरम्यानचे धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. अशातच काही राजकीय नेतेमंडळींनी आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यातील अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन किरण मानेंनी एक पोस्ट लिहिलीय, जी सध्या तुफान चर्चेत आहे. 

सोशल मीडियावर दहीहंडी सोहळ्याचा एक व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दहीहंडीच्या एका कार्यक्रमात मराठीतली नावाजलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Marathi Actress Jahnavi Killekar) आणि रिलस्टार प्रणाली सूर्यवंशी (ReelStar Pranali Suryavanshi) एकाच मंचावर असल्याचं पाहायला मिळतंय. याच व्हिडीओचा संदर्भ देत अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

बदलत्या काळाची पावलं ओळखता यायला हवीत... पूर्वी… अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत मराठीत सिनेमा-टीव्ही कलाकार म्हणजे, सगळ्यात मोठे 'सेलिब्रिटी' मानले जायचे. आज ती जागा 'रीलस्टार्स'नी घेतलीय, असं किरण माने यांनी म्हटलंय. 

जान्हवी किल्लेकर आणि रिलस्टार प्रणाली सूर्यवंशीच्या 'तो' VIRAL VIDEO (Janhvi Killekar Reel star Pranali Suryavanshi VIRAL VIDEO)

दहीहंडीमधील एका इव्हेंटला जान्हवी किल्लेकर आणि रीलस्टार प्रणाली सूर्यवंशी यांनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालेला. दहीहंडीच्या त्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलेलं. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला जान्हवी माईकवर बोलत असते. त्यानंतर अँकर रीलस्टार प्रणाली सूर्यवंशी हिला माईकचा ताबा घ्यायला सांगतो. तेव्हा जान्हवी किल्लेकर चिडल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किरण मानेंनी त्या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय? (Kiran Mane Facebook Post)

मराठी अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, "बदलत्या काळाची पावलं ओळखता यायला हवीत. पूर्वी… अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत मराठीत सिनेमा-टीव्ही कलाकार म्हणजे, सगळ्यात मोठे 'सेलिब्रिटी' मानले जायचे. आज ती जागा 'रीलस्टार्स'नी घेतली आहे. हल्ली लोकांना सिनेकलाकारांपेक्षा रीलस्टार्सचे डायलॉग ऐकायचे असतात. रीलस्टार्सना बघायचं असतं. दहीहंडीसारख्या कार्यक्रमांना मराठी कलाकारांपेक्षा रीलस्टार्स, टीव्ही-सिनेमाच्या हिरोइन्सपेक्षा गौतमीसारखे डान्सर्स जास्त मानधन घेऊ लागलेत..."

"नांदेड सिटीच्या दहीहंडी कार्यक्रमात आमच्या 'बिग बॉस' फेम जान्हवीपेक्षा लोकांना रीलस्टार प्रणाली सूर्यवंशीचं जास्त अप्रूप होतं… हे एक प्रातिनिधिक उदाहरण!", असं किरण माने यांनी म्हटलंय. 

पुढे बोलताना किरण माने म्हणालेत की, "हे योग्य आहे की अयोग्य, या चर्चा होत रहातील. कोण म्हणेल मराठी कलाकारांचा आणि कलाकृतीच्या विषयांचा सर्वसामान्य प्रेक्षकांच्या जगण्याशी 'कनेक्ट' नाही. कोण म्हणेल हल्ली जेन झी मराठी सिरियल सिनेमे बघतच नाही. कोण म्हणेल सुमारांची सद्दी.. पण या चर्चा भाकड आहेत. त्याने परिस्थिती बदलणार नाही. काळ बदलतोय. लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत. विशेषतः मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलं गेलं आहे. कारणं अनेक असतील. पण जे आहे, ते आहे..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sai Tamhankar On Motherhood: 'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rajpal Yadav Supreme Court Hearing: 'मी स्वतःच एक तमाशा बनलोय...'; राजपाल यादवचा कोर्टातच इमोशनल ड्रामा, चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढणार?
'मी स्वतःच एक तमाशा बनलोय...'; राजपाल यादवचा कोर्टातच इमोशनल ड्रामा, चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढणार?
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget