एक्स्प्लोर

हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिनच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. ईडीने न्यायालयाला सांगितले की, याचिका अस्पष्ट आणि अपूर्ण असून, उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे

Jacqueline Fernandez: तब्बल 200 कोटी रुपयांच्या हाय-प्रोफाईल मनी लाँड्रिंग प्रकरणात एक नवीन कायदेशीर वळण आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात माफीची साक्षीदार बनण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखरचा समावेश आहे, ज्याच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. जॅकलिन फर्नांडिस ही सुकेश चंद्रशेखरची गर्लफ्रेंड आहे. सुकेशने तिला आतापर्यंत कोट्यवधींच्या वस्तू भेट केल्या आहेत. 

जॅकलिनच्या अर्जावर ईडीचा आक्षेप 

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिनच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. ईडीने न्यायालयाला सांगितले की, याचिका अस्पष्ट आणि अपूर्ण असून, उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. न्यायालयाने ईडीची विनंती मान्य केली आणि उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला. जॅकलिनने न्यायालयाला सांगितले की, तिची तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची आणि सत्य उघडकीस आणण्यास मदत करण्याची इच्छा आहे. माफीच्या साक्षीदाराचा दर्जा दिल्यास, ती तपासात आरोपींपासून वेगळी होऊन साक्षीदार बनू शकेल. ही प्रक्रिया न्यायालयाची मंजुरी आणि ईडीच्या संमतीवर अवलंबून आहे.

या प्रकरणात अंदाजे 200 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा समावेश आहे. सुकेश चंद्रशेखरवर उच्चभ्रू व्यक्तींना लक्ष्य करून बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणेचा दावा आहे की, या प्रकरणात मोठे व्यवहार आणि महागड्या भेटवस्तूंचा वापर करण्यात आला. जॅकलिन फर्नांडिस या प्रकरणात बऱ्याच काळापासून चौकशीला सामोरे जात आहे. तिने यापूर्वी दावा केला आहे की, तिला सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल माहिती नव्हती आणि खोट्या माहितीच्या आधारे तिला यात गोवण्यात आले. आता, ईडीचे न्यायालयातील उत्तर आणि पुढील सुनावणी या प्रकरणाची दिशा ठरवेल.

सुकेश म्हणाला, प्रेमात आणि युद्ध सर्वकाही माफ 

दरम्यान, जॅकलिनने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करताच सुकेशने जेलमधून चिट्टी लिहिली आहे. त्या चिट्टीत त्याने All is fair in Love and War असं म्हटलं आहे. तू जो निर्णय घेशील त्याला माझा पाठिंबा असेल असेही म्हटलं आहे. 

सुकेशने जॅकलिनला काय काय दिलं?

  • सुकेशने जॅकलिनला प्राणीप्रेमी म्हणून अनेक महागडे प्राणी भेट दिले होते
  • पर्शियन मांजरी: सुमारे 6 लाख रुपये किमतीच्या एकूण चार पर्शियन मांजरी.
  • अरबी घोडा: 'एस्पुएला' नावाचा एक अरबी घोडा, ज्याची किंमत 52 लाख रुपये होती.
  • 15 जोड झुमके (Earrings), महागडे हिऱ्यांचे हार आणि ब्रेसलेट्स.
  • गुच्ची (Gucci) आणि चॅनेल (Chanel) यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या अनेक महागड्या हँडबॅग्स, जिमी चू (Jimmy Choo) चे शूज आणि लुई विटॉनचे कपडे.
  • घड्याळे: कोट्यवधी रुपयांची रोलेक्स (Rolex) सारखी महागडी घड्याळे.
  • जॅकलिनला सुकेशने एक 'मिनी कूपर' (Mini Cooper) कार भेट दिली होती (जी नंतर तिने परत केल्याचे सांगितले जाते).
  • डिझायनर क्रॉकरी: युवरोज कंपनीची महागडी क्रॉकरी सेट.

अलीकडील दावे (तुरुंगातून केलेली घोषणा)

  • तुरुंगात असतानाही सुकेशने पत्रांद्वारे जॅकलिनला अनेक अजब भेटवस्तू देण्याचे दावे केले आहेत.
  • प्रायव्हेट जेट: व्हॅलेंटाईन डे निमित्त जॅकलिनच्या नावाचे आद्याक्षरे (JF) असलेले खास 'गल्फस्ट्रीम जेट'.
  • आलिशान बंगला: बेव्हरली हिल्स (अमेरिका) येथे 'द लव्ह नेस्ट' नावाचा बंगला दिल्याचा दावा.
  • बाली बेटाचा भाग: तिच्या आईच्या आठवणीत बाली बेटाचा एक भाग तिला दिल्याचे सुकेशने पत्रात म्हटले होते.
  • 'लेडी जॅकलिन' नावाची एक आलिशान यॉट (Yacht).

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office: 'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?
'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?
Prapti Redkar Diwali: 'दिवाळी म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी...'; प्राप्ती रेडकरने सांगितल्या चाळीतल्या दिवाळीच्या आठवणी
'दिवाळी म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी...'; प्राप्ती रेडकरने सांगितल्या चाळीतल्या दिवाळीच्या आठवणी
Pawan Kalyan Divorce: अभिनेता अन् उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं तिसरं लग्नही मोडलं; रशियन पत्नीशी काडीमोड, कारण काय?
अभिनेता अन् उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं तिसरं लग्नही मोडलं; रशियन पत्नीशी काडीमोड, कारण काय?
Dia Mirza Diwali: दिवाळीच्या व्हिडीओवरुन वाद; आता विधीवत लक्ष्मीपूजन, फोटो पोस्ट करत दिया मिर्झाने दिलं लक्षवेधी कॅप्शन, चाहते म्हणाले...
दिवाळीच्या व्हिडीओवरुन वाद; आता विधीवत लक्ष्मीपूजन, फोटो पोस्ट करत दिया मिर्झाने दिलं लक्षवेधी कॅप्शन, चाहते म्हणाले...

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Embed widget