Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झालीये. सुकेश चंद्रशेखरने केलेल्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग केसमध्ये जॅकलीनच्या सहभागाबाबत ईडीने (सक्तवसुली संचनालय) भाष्य केलय. ईडीने उच्च न्यायालयात जॅकलीनबाबत माहिती दिली आहे. "200 कोटींच्या मनी लाँड्रिंग केसमध्ये जॅकलीन सर्वकाही माहिती असताना आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून पैसे उकळत होती. सुकेशने अनधिकृतपणे जमावलेल्या पैशांचा उपभोग घेण्यात जॅकलीनचाही सहभाग होता. शिवाय तिने या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केलाय", असे उत्तर जॅकलीनच्या न्यायालयातील याचिकेवर ईडीने दिले आहे.


जॅकलीन फर्नांडिसने मनी लाँड्रिंग केसविराधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिच्याविरोधात खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा जॅकलीनने न्यायालयात केला होता. या याचिकेवर ईडीने काही कागदपत्रे न्यायालयात दाखल केली आहेत. न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावनी झाली. जॅकलीनच्या वकिलांनी ईडीने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. न्यायालयाने या प्रकरणी 15 एप्रिलला पुढील सुनावनी होईल, असे स्पष्ट केले आहे. 


जॅकलीनवर गंभीर आरोप 


"अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारात पूर्णपणे सामील होती. तिने आत्तापर्यंत कधीही सुकेश चंद्रशेखरकडून घेतलेल्या पैशांबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. जॅकलीन या प्रकरणातील तिचा सहभाग लपवत राहिली. शिवाय, सुकेशकडून पैशांचा तिने वेळोवेळी उपभोग घेतला आहे. तिने सर्वकाही जाणूनबुजून केले आहे", असे आरोप ईडीने न्यायालयाने केले आहेत. 


काय आहे संपूर्ण प्रकरण?


सुकेश चंद्रशेखर संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात डिसेंबर 2021 मध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचेही नाव समोर आले होते. यानंतर ईडीने तपास केल्यानंतर जॅकलीनलाही आरोपी केले होते. शिवाय जॅकलीनची या प्रकरणात अनेकदा चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर जॅकलीन आणि सुकेशच्या नात्याबाबत सर्वांना माहिती मिळाली होती. सुकेश तुरुंगात असताना जॅकलीन त्याला भेटण्यासाठी जात होती. सुकेशने तिला अनेक महागडे गिफ्ट दिले होते. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, या प्रकरणात अभिनेत्री जॅकलीनने अधिकृतरित्या कोणतेही भाष्य केले नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. 


अक्षय कुमारसोबत 'या' सिनेमात दिसणार जॅकलीन 


मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या जॅकलीनचा बॉलिवूडमधील प्रवास सुरुच आहे. तिने आजवर अनेक हिट सिनेमे देखील केले आहेत. आता ती अभिनेता अक्षय कुमार याच्या वेलकम टू जंगला या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेवटचा सिनेमादेखील तिने अक्षयसोबतच केला होता. सेल्फी असे त्या सिनेमाचे नाव होते. सध्या ती फतेह या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rashmika Mandanna Vijay Deverakonda : "तो' माझा सगळ्यात मोठा समर्थक"; विजय देवरकोंडाच्या प्रेमात आकंठ बुडाली रश्मिका मंदाना