Jackie Shroff On Romantic Scene: जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांनी '100 डेज' (100 Days), 'राम लखन' (Ram Lakhan), 'देवदास' (Devdas), 'त्रिदेव' (Tridev) आणि 'परिंदा' (Parinda) यासारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांची पहिली भेट 'कर्मा' सिनेमाच्या सेटवर झाली होती. अलिकडेच, हे दोन्ही कलाकार 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये (The Great Indian Kapil Show) दिसलेले, जिथे जॅकी श्रॉप यांनी माधुरीबाबत खुलासा केला, जे ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुटिंगवेळी माधुरीशी रोमान्स तर दूरच, पण तिच्याशी नजर मिळवायलाही लाज वाटायची, असं जॅकी श्रॉफ म्हणाले.  

जॅकी श्रॉफ यांनी सांगितला माधुरीसोबतच्या ऑन स्क्रिन रोमान्सचा 'तो' किस्सा (Jackie Shroff On Romantic Scene Madhuri Dixit)

कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या शोच्या नव्या भागात सुनील ग्रोव्हर, किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक, जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित यांच्यासह, जॅकी श्रॉफ यांनी धमाल केली. या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या काही आठवणींनाही उजाळा दिला. माधुरी दीक्षितसोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले की, "मी सरोज खान यांच्याकडून माधुरीबद्दल पहिल्यांदा ऐकलं. मी सुभाष घईंना सांगितलं की, माधुरी एक सुंदर हिरोईन आहे आणि एक उत्तम डान्सर आहे, जी इंडस्ट्रीमध्ये आलीय, त्यांनी तिला कास्ट करावं..." कपिल शर्मानं जॅकी श्रॉफला विचारलं की, माधुरी दीक्षितचा डान्स पाहण्यासाठी ते त्याची रिहर्सल का सोडून यायचा? त्यावर जग्गू दादानं सांगितलं की, "कधीकधी तुम्हाला स्वतःला विसरून जावं लागतं. माधुरीनं माझ्यासोबत सर्व प्रकारच्या भूमिका केल्यात आणि मी नेहमीच आनंदी असतो... संगीत सिनेमात तिनं माझी पत्नी, माझी प्रेयसी आणि माझ्या सासूची भूमिका साकारली होती..."

"माधुरीसोबत रोमँटिक सीन करताना लाज वाटायची..." : जॅकी श्रॉफ 

कपिल शर्मानं माधुरी दीक्षितला विचारलं की, सिनेमात तिच्याशी रोमान्स करताना कोणत्याही अभिनेत्याला घाबरल्यासारखं वाटत होतं का? त्यावर लगेचच मान्य करत जॅकी श्रॉफ म्हणाले की, "मला माधुरीशी रोमान्स करताना लाज वाटायची... मला त्याची सवय नव्हती. सिनेमा वास्तविक जीवनावर आधारित असतात आणि काही भावना वैयक्तिक असतात... त्या हृदयात राहतात. तुम्ही त्या पडद्यावर कशा दाखवू शकता? जेव्हा ती बोलते, तेव्हा तिच्या डोळ्यात पाहून बोलणं किंवा गाणं खूप कठीण असतं... ती खूप गोड आणि भावपूर्ण आहे... ती तिच्या व्यक्तिरेखेत मग्न होते... जेव्हा एखादा रोमँटिक सिनेमा असतो, तेव्हा ती खरोखरच रोमान्स करते..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sonalee Kulkarni Share Painful Experience: 'पण तू आता वयानं मोठी दिसतेस'; मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीला हिंदी प्रोजेक्टमधून काढलं, वाईट अनुभवाबाबत म्हणाली...