Jaat Box Office Collection Day 5: सनी देओलचा (Sunny Deol) 'जाट' (Jaat Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) रिलीज झाला आणि त्यानं धुमाकूळ घातला. या चित्रपटानं भल्याभल्यांना पछाडलं आहे. फिल्म रिलीज होऊन 5 दिवस उलटले असून फिल्मच्या नशीबात विकेंड, बँक हॉलिडे यांचं दान पडलं. परिणामी कमाईचा आकडा हळूहळू का होईना, वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. सततच्या सुट्ट्यांमुळे चित्रपटाच्या कमाईला फायदा झाला आहे.
सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचासुद्धा चित्रपटाला मोठा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. सोमवारच्या कलेक्शनबाबत समोर आलेल्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केलीय? एकून कलेक्शन किती? सविस्तर जाणून घेऊयात...
'जाट' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
अधिकृत आकडेवारीनुसार, 'जाट'नं पहिल्या दिवशी 9.62 कोटी, दुसऱ्या दिवशी 7 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 9.95 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी 14.05 कोटी रुपये कमावून एका दिवसात सर्वाधिक कमाई केली आणि 4 दिवसांत एकूण 40.62 कोटी रुपये कमावले.
सकनिल्कच्या मते, चित्रपटाने सकाळी 11 वाजेपर्यंत 7.50 कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे एकूण कमाई 48.12 कोटी रुपये झाली आहे. कृपया लक्षात घ्या की सॅक्निल्कवर उपलब्ध असलेले हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये काही बदल असू शकतात, जे आम्ही वेळोवेळी अपडेट करत राहू.
'जाट'नं मोडला बॉर्डरचा रेकॉर्ड
'जाट'नं सनी देओलच्याच 1997 साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट 'बॉर्डर'चा लाईफटाईम कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आहे. बॉलीवूड हंगामाच्या मते, बॉर्डरनं 39.46 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता, 'जाट' 2011 मध्ये आलेल्या 'यमला पगला दीवाना' (55.28 कोटी रुपये) आणि 2001 मध्ये आलेल्या 'गदर' (76.88 कोटी रुपये) या चित्रपटांना मागे टाकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, 'जाट'चं दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी केलं आहे. मैत्री मूव्ही मेकर्स या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवण्यात आलेल्या या चित्रपटाला 100 कोटी रुपये खर्च आले आहेत. सनी देओलनं 'जाट'मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच, नकारात्मक भूमिकेत दिसणारा रणदीप हुड्डाच्या अभिनयाचंही खूप कौतुक होत आहे.
विक्की कौशलच्या 'छावा' या चित्रपटात कवी कलेशची भूमिका साकारणारा विनित कुमार सिंह देखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. रेजिना कॅसांड्रा, जगपती बाबू, सैयामी खेर आणि राम्या कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :