Jaat Box Office Collection Day 14: 'गदर 2' (Gadar 2) नंतर, सनी देओल त्याच्या 'जाट' (Jaat Movie) या चित्रपटासह पडद्यावर परतला. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि निर्माते आणि प्रेक्षकांनाही त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. दरम्यान, आता या सर्व आशा धुळीस मिळाल्यासारखे वाटतात. 'जाट' प्रदर्शित होऊन 14 दिवस झाले आहेत आणि चित्रपटाचा खर्चही अद्याप वसूल झालेला नाही.
सॅक्निल्कच्या अहवालानुसार, 'जाट'नं पहिल्या आठवड्यात 61.65 कोटी रुपयांची शानदार कमाई केली. यानंतर 'केसरी 2' प्रदर्शित झाला आणि नवव्या दिवशी सनी देओलचा चित्रपट फक्त चार कोटी कमाई करू शकला. 'जाट' चित्रपटाचं कलेक्शन दहाव्या दिवशी 3.75 कोटी रुपये, अकराव्या दिवशी 5 कोटी रुपये आणि बाराव्या दिवशी 1.85 कोटी रुपये होते. तेराव्या दिवशीही चित्रपट फक्त 1.84 कोटी रुपयांची कमाई करू शकला. आता चौदाव्या दिवसाचे सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत.
'जाट' चित्रपटाचं चौदाव्या दिवसाचं कलेक्शन
'जाट' चित्रपटानं चौदाव्या दिवशी (रात्री 11 वाजेपर्यंत) फक्त 1.09 कोटी रुपये कमावले आहेत. आता दोन आठवड्यांत चित्रपटाचं एकूण कलेक्शन 79.22 कोटी रुपये झालं आहे. बजेटबद्दल बोलायचं झालं तर, सनी देओलचा हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 100 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. 'जाट'च्या संथ कलेक्शनवरून असं दिसून येतंय की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ शकतो.
सनी देओलचा 'जाट' का फ्लॉप होणार?
'जाट' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, येत्या काळात अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यानंतर, 'जाट'ला दिलेल्या स्क्रिन्समध्ये नक्कीच घट होईल. त्यानंतर 1 मे रोजी अजय देवगणचा 'रेड 2' आणि संजय दत्तचा 'द भूतनी' हे चित्रपटही प्रदर्शित होतील. अशा परिस्थितीत 'जाट' पूर्णपणे नष्ट होणार हे निश्चित आहे.
'जाट' नंतर सनी देओल अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचा 'बॉर्डर 2', नितेश तिवारीचे 'रामायण' आणि 'लाहोर 1947' सारखे चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत.