Ismail Darbar Slams Sanjay Leela Bhansali: '100 कोटी मिळाले तरी भन्साळींची फिल्म करणार नाही...'; 'देवदास'च्या म्युझिक डायरेक्टरचं संजय लीला भन्साळींवर टीकास्त्र
Ismail Darbar Slams Sanjay Leela Bhansali: विक्की ललवानीच्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीदरम्यान, संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी संजय लीला भन्साळींना गर्विष्ठ म्हटलं आणि सांगितलं की, त्यांना 100 कोटी रुपये ऑफर केले तरी ते त्यांच्यासोबत काम करणार नाहीत.

Ismail Darbar Slams Sanjay Leela Bhansali: बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शक आणि म्युझिक कंपोझर्सची नावं घेतली तर, सर्वात आधी संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आणि इस्माइल दरबार (Ismail Darbar) यांच्या जोडीचं नाव सर्वात आधी घेतलं जाईल. एक काळ असा होता, जेव्हा संजय लीला भन्साळी आणि इस्माईल दरबार यांची जोडी उत्तम मानली जायची, पण सध्या त्यांच्यात काहीतरी बिनसल्याचं बोललं जातंय. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात जेव्हा जेव्हा इस्माईल दरबारचं संगीत वाजवलं जायचं, तेव्हा तेव्हा चित्रपटावर त्यांचा प्रभाव झाल्याचं दिसायचं. 'हम दिल दे चुके सनम' असो किंवा 'देवदास', त्यांच्या कलाकृतीतील हे दोघेही एकत्र आले, तेव्हा ते हिट झाले. पण नंतर असं काहीतरी घडलं, ज्यामुळे त्यांचे मार्ग वेगळे झाले. विक्की ललवानीच्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीदरम्यान, संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी संजय लीला भन्साळींना गर्विष्ठ म्हटलं आणि सांगितलं की, त्यांना 100 कोटी रुपये ऑफर केले तरी ते त्यांच्यासोबत काम करणार नाहीत.
इस्माइल दरबार, भन्साळी यांच्यात मदभेत का निर्माण झाले?
'हीरामंडी: द डायमंड बाजार'चं म्युझिक ही सीरिजचा सर्वात मजबूत बाजू असल्याचं बोललं गेलं आणि याचं सर्व श्रेय इस्माईल दरबारला दिलं गेलं. तेव्हापासूनच दोघांच्या मैत्रीत दुरावा आल्याचं पाहायला मिळतंय. संजय लीला भन्साळी आणि इस्माईल दरबार यांच्यातील संबंध बिघडले. दरबारनं ही बातमी पसरवली, असं संजय लीला भन्साळी यांना वाटलं, ज्यामुळे त्यांच्या नात्यात मोठा तणाव निर्माण झाला.
इस्माईल दरबार म्हणाले की, "मी भन्साळींना सांगितलं होतं की, जर मला काही बोलायचं असेल तर मी उघडपणे बोलण्यास घाबरणार नाही. पण मला त्या बातमीबद्दल काहीही माहिती नव्हती..." त्यानंतर संजय लीला भन्साळींनी इस्माईल दरबार कार्यालयात बोलावलं आणि चौकशी केली, ज्यामुळे दरबार यांना वाटलं की, भन्साळी त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरबार म्हणाले, "मी स्वतःहून हीरामंडी सोडली, कारण मला समजलं की, तो मला काढून टाकण्याचा विचार करतोय..."
इस्माइल दरबारनं काय म्हटलं?
इस्माइल दरबारनं असादेखील खुलासा केलाय की, 'गुजारिश'मध्येही तो संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करणार होता, पण 'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास' दरम्यान झालेल्या मतभेदांनी त्यांचं नातं खराब केलं. त्यांनी दावा केलाय की, भन्साळींनी त्यांच्या पीआर टीमला इस्माइल दरबारची मुलाखत घेऊ नका, असे निर्देशही दिले होते. इस्माईल दरबार म्हणाले की, "भन्साळींनी त्यांच्या चित्रपटासाठी म्युझिक देण्यासाठी मला 100 कोटी रुपये देऊ केले, तरी मी म्हणेन, 'ते पैसे घेऊन इथून निघून जा..."
























