एक्स्प्लोर

Web Series : एमएक्स प्लेअरवर नव्या सीरिजची चर्चा, ‘इश्क इन द एअर’ 'या' दिवशी होणार रिलीज

Web Series : एमएक्स प्लेअरवर ‘इश्क इन द एअर’ ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Series :  अॅमेझॉन एमएक्स प्लेयर (MX Player) या अॅमेझॉनच्या विनामूल्य व्हीडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत अनेक सीरिज रिलीज करण्यात आल्या आहेत. नुकतीच आता यावर एका नव्या रिलीजची चर्चा सुरु आहे. इश्क इन द एअर’ही सीरिज येत्या 20 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सीरिजचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.  इंदूर आणि मुंबई या दोन परस्परविरोधी शहरांच्या पार्श्वभूमीवर घडणारे कथानक या सीरिजचे आहे. बीबीसी स्टुडिओज प्रॉडक्शन इंडियाने निर्मित केलेल्या या सीरिजमध्ये  शांतनु माहेश्वरी  आणि मेधा राणा  यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नुकताच या सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.  इंदूरमधील मेहनती फोटोग्राफर नमनचे आयुष्य ह्यातून उलगडण्यात आले आहेत. नमन त्याच्या कौटुंबिक व्यावसायामध्ये गुंतलेला आहे. दुसरीकडे काव्या ही मुंबईतील एक बिनधास्त मुलगी, जी हेयरस्टाईलिस्ट आहे. स्वतःचा स्वतंत्र मार्ग घडविण्याच्या प्रयत्नात ती आहे. 

ही प्रेमाची गोष्ट घडणार?

विमानतळावर अचानक झालेल्या भेटीमुळे  नमन आणि काव्या समोरासमोर येतात आणि त्यांच्या प्रवासाला सुरुवात होते. त्यानंतर त्यांच्या दोघांच्याही आयुष्यात एक वळण येतं आणि ते त्यांना नव्याने सापडलेल्या नात्याचा शोध घ्यायला लागतात. नमन आणि काव्या एकमेकांमधलं अंतर कमी करुन त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात करणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 

कलाकारांनी काय म्हटलं?

दरम्यान या सिनेमात नमनची भूमिका साकारणार्‍या शांतनु माहेश्वरी यांनी म्हटलं की, एमएक्स प्लेयरवर  पुन्हा एकदा एक नवी गोष्ट अनुभव छान वाटतंय. ही सीरिज प्रेक्षकांना खूप भावेल.  इश्क इन द एअर  ही एक प्रेमकथा आहे, जी वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या नमन आणि काव्या या दोन व्यक्तींना एकत्र आणते. ते प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात करतात. नमन आणि काव्या, यांच्या प्रेमाचे विमान उंच भरारी घेत असताना, ते जीवनातील चढ-उतारांमधून संबंध आणि भक्तीचा खरा अर्थ शोधून काढतात. त्यामुळे आता प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. 

काव्या मेहराची भूमिका साकारणाऱ्या मेधा राणाने म्हटलं की,  "इश्क इन द एअर ही एक प्रेमकथा आहे, जी प्रेक्षकांना एक सुंदर अनुभव देईल. या प्रोजेक्टवर काम करणं हा एक खरंच मजेदार आणि समृद्ध करणारा अनुभव आहे.  प्रेक्षकही यावर तितकंच प्रेम करतील, जेवढं आम्ही तो तयार करताना केलं होतं, यावर मलाही विश्वास आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Medha Rana (@medhaarana)

ही बातमी वाचा : 

Stree 2 OTT Release: सिनेमागृहानंतर आता 'तो' तुमच्या घरी येणार, कधी आणि कुठे पाहाल 'स्त्री-2'?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget