Isha Keskar On Marathi Industry: मराठी मनोरंजनसृष्टीतील (Marathi Industry) अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'जय मल्हार' (Jai Malhar) या मालिकेतील बानूची भूमिका असेल किंवा 'लक्ष्मीच्या पावलांनी'मधील (Lakshmichya Paulanni) 'कला' ची भूमिका असेल. दोन्ही भूमिकांमुळे ती घराघरांत पोहोचली. मात्र, दोन्ही मालिका मधूनच सोडल्यामुळे इंडस्ट्रीत 'ही मालिका सोडणारी अभिनेत्री' असल्याची टीकाही तिच्यावर करण्यात आली. पण, आता सध्या ईशानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या करिअरच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. करिअरमधले चढ उतार तसेच मानधनाच्या मुद्द्यावर तिनं भाष्य केलंय. 'जय मल्हार' झी मराठीवरील मालिकेसाठी तिला किती पैसे मिळायचे याचा सुद्धा तिनं खुलासा केलाय.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ईशा केसकरनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. मी 'जय मल्हार'मध्ये काम करत होते, तेव्हा मला सुरुवातीला 1500 रुपये पर डे मिळत होता, असं ईशा केसकरनं सांगितलं. तसेच, तुम्हाला जर मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम, असंही ईशा पुढे म्हणाली आहे.
अभिनेत्री ईशा केसकर नेमकं काय म्हणाली? (Isha Keskar On Marathi Industry)
'जय मल्हार' फेम अभिनेत्री ईशा केसकर म्हणाली की, "मी 'जय मल्हार'मध्ये काम करत होते, तेव्हा मला सुरुवातीला 1500 रुपये पर डे मिळत होता. माझे सगळे पैसे मी माझ्या आई-बाबांना द्यायचे. त्यातले थोडे पैसे ते मला मुंबईत राहण्यासाठी आणि माझ्या उदरनिर्वाहासाठी द्यायचे. त्यांचं नियंत्रण होतं तोवर गोष्ट वेगळी होती, पण जसजशा मी मालिका करत गेले, तशा जितकी आव्हानात्मक भूमिका असेल, तितक्या मी त्या स्वीकारायचे. मग मी मालिकेच्या टीमला सांगायचे की, ठीक आहे... या आव्हानात्मक भूमिकेला तुम्ही मला एवढे पैसे देत आहात, पण जर मी हा रोल चांगला केला, तर मला पुढच्या वर्षी एवढे पैसे पाहिजे... असं करून मी काम केलंय... तुम्हाला जर मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम... मी तिथे तडजोड करणार नाही. खरंतर माझ्या याच स्वभावामुळे मी सुखी आहे, असं मला वाटतंय... कारण अभिनेत्री असूनही मला खोटं वागता येत नाही. याचा मला आश्चर्य वाटतंय..."
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईशा केसकर 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत दिसलेली, या मालिकेत तिनं कला ही व्यक्तिरेखा साकरेली. पण, ईशानं ही मालिका अर्ध्यातूनच सोडली. अशातच आता आगामी कोणत्या मालिकेत दिसणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
