अग्गं बाई तुला कळतं का काही? रेड कार्पेटवर फाटलेला ड्रेस घालून पोहोचली उर्वशी रौतेला; VIDEO व्हायरल
Urvashi Rautela At Cannes Red Carpet: उर्वशी ट्रोल होण्याचं कारणंही तसं जरा हटकेच होतं. नेटकऱ्यांनी उर्वशीच्या फाटलेल्या ड्रेसमुळे तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

Urvashi Rautela At Cannes Red Carpet: यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Red Carpet) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. रेड कार्पेटवर तर आपल्या क्लासी आऊटफिट्सनी अनेकांनी आग लावली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हटके आणि क्लासी आऊटफिट्सच्या चर्चा संपूर्ण जगभरात रंगल्याचं पाहायला मिळालं. अशातच बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाही दुसऱ्यांदा रेड कार्पेटवर दिसून आली. आपल्या इंटरनेट ब्रेकिंग, हटके लूक आणि वेगवेगळ्या पण क्लासी ड्रेसेससाठी ओळखली जाणारी उर्वशी यंदा रेड कार्पेटवर आपला क्लासी आऊटफिट फ्लॉन्ट करताना दिसली. पण, नेहमी सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवणारी उर्वशी यंदा मात्र, जोरदार ट्रोल होताना दिसली.
उर्वशी ट्रोल होण्याचं कारणंही तसं जरा हटकेच होतं. नेटकऱ्यांनी उर्वशीच्या फाटलेल्या ड्रेसमुळे तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नेटकऱ्यांनी उर्वशीला चांगलंच फैलावर घेतलं असून तिच्या अद्दल घडवली आहे.
उर्वशी रौतेला रेड कार्पेटवर उतरली, तिचा यावेळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 78व्या वार्षिक कान्स चित्रपट महोत्सवात ओ एजंटे सेक्रेटो (ल'एजंट सीक्रेट/द सीक्रेट एजंट) च्या स्क्रीनिंगमध्ये उर्वशी रौतेला रेड कार्पेटवर दिसून आली. अभिनेता नाझा सादे कॉउचरच्या काळ्या सिल्क सिल्क तफेटा गाऊनमध्ये उर्वशी फार सुंदर दिसत होती. उर्वशी रेड कार्पेटवर आली आणि तिनं वेगवेगळ्या पोज देण्यास सुरुवात केली. तिनं सर्वांना अभिवादन करण्यासाठी हात उंचावला पण, तेवढ्यात जे दिसायला नको होतं, तेच दिसलं. उर्वशीचा ड्रेस फाटला होता.
Urvashi Rautela :- First Indian to have a torn dress at Cannes? pic.twitter.com/ZqePMasB4K
— raman (@Dhuandhaar) May 18, 2025
उर्वशीच्या फाटलेल्या ड्रेसबाबत काय म्हणालं इंटरनेट?
फॅशन इंस्टाग्राम पेज डाएट सब्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीचा एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये उर्वशीवर कमेंट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये म्हटलेलं की, "हे बघा, या सेंसेशनचा सन्मान करायला हवा. बिचारी मला तिच्यासाठी खूप वाईट वाटतंय. कान्सच्या रेड कार्पेटवर चालणं, जिथे कुणीच पॅपाराजी नाहीत, खरंतर मृत्यूला कवटाळल्यासारखं आहे." एका युजरनं तिच्या स्टोरीवर कमेंट केली. "क्या वहां कोई छेद है????" आणखी एका युजरनं लिहिलंय की, "कान्समध्ये फाटलेला ड्रेस घालणारी पहिली भारतीय?"
ब्लॅक गाऊनमझ्ये क्रू नेकलाईनसोबत लांब स्लीव्स, प्लंजिंग स्वीटहार्ट नेक डिटेल, मिड्रिफला गळ्यापर्यंत आणणारा कोर्सेटवाला टॉप, सिन्च्ड वेस्टलाइन, सिल्कची लेअर असलेला प्लीटेड वॉल्यूमिनस स्कर्ट, फ्लोर-ग्रेजिंग सिल्हूट आणि मागच्या वाजूला असलेली ट्रेल, असा काहीसा उर्वशी रौतेलाचा गाऊन होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















