Is Suraj Chavhan Indian Justin Biber? 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) सीझन 5 चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसची ट्रॉफी उंचावल्यानंतर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला झापूक झुपूक गुलिगत स्टार सूरज चव्हाणला भारताचा 'जस्टिन बीबर' म्हणून संबोधलं जातंय. तसेच, त्याला हँडसम मॅनचा (Most Handsome Man) खिताब मिळाल्याचाही दावा सोशल मीडिया पोस्ट आणि काही परदेशातल्या साईट्स करत आहेत. या दाव्यांमुळे सध्या सोशल मिडिया साईट्सवर गदारोळ माजला आहे. अनेकांनी सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तर काहींनी सूरज चव्हाणला खरंच असा कोणता खिताब मिळालाय का? अशी विचारणाही केली आहे.
सूरज चव्हाणला 'भारताचा जस्टिन बीबर' असं संबोधणाऱ्या सोशल मिडिया पोस्ट व्हायरल झाल्या. सूरज चव्हाणला असं संबोधलं जाण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, त्याची केसांची स्टाईल आणि त्यांची सडपातळ शरीरयष्टी. त्याचे केस त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात (सुमारे 2010) प्रसिद्ध कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबर याच्या लूकसारखेच होते. परदेशी युजर्स सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत आणि त्याच्या लूकची तुलना त्या काळातील जस्टिन बीबरच्या लूकशी करत आहेत. सूरज चव्हाणची तुलना थेट जस्टिन बीबरशी केली गेल्यामुळे भारतीय चाहते मात्र पुरते हैराण आहेत. सध्या सूरज चव्हाणचा 'बीबर लूक' (Bieber Look) मधला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सूरज चव्हाण 'मोस्ट हँडसम मॅन'?
'भारताचा सर्वात हँडसम मॅन' असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पण सत्य खूपच वेगळं आहे. ट्विटरवरील कम्युनिटी नोट्सद्वारे या दाव्याची तथ्य तपासणी करण्यात आली. पण, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं. खरं तर, भारतात 'सर्वात हँडसम मॅन' हा टॅग कुणाला देण्यासाठी कोणतीही अधिकृत सरकारी मतदान प्रणाली किंवा राष्ट्रीय स्तरावरील मतदान प्रणालीही नाही. त्यामुळे हे सिद्ध झालं की, ही बातमी कोणत्याही तथ्याशिवाय पसरवलेली अफवा आहे. सूरज चव्हाण त्यांच्या कंटेंटसाठी प्रसिद्ध आहे, पण त्याला अधिकृतपणे 'भारताचा सर्वात हँडसम मॅन' अशी कोणताही खिताब देण्यात आलेला नाही.
सोशल मीडियामुळे रिलस्टार बनला सूरज चव्हाण
सूरज चव्हाणची खरी ओळख त्याच्या सोशल मीडिया स्टारडममध्ये आहे. महाराष्ट्रातील बारामतीजवळील मोढवा या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्या सूरजनं अत्यंत गरिबी आणि संघर्षाचा सामना केला. सुरुवातीला टिकटॉक आणि त्यानंतर इंस्टाग्राम रील्सवरील त्याच्या अनोख्या बोलीभाषेमुळे आणि 'बुक्किट टेंगुल' सारख्या त्याच्या व्हायरल डायलॉग्समुळे तो एका रात्रीत स्टार बनला. आज, त्याचे इंस्टाग्रामवर 2.9 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचा साधेपणा आणि प्रामाणिकपणामुळे तो बिग बॉस मराठी 5 चा विजेता बनला, लोकांनी त्याला प्रचंड प्रेम दिलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :