Investigative drama thriller film : जर तुम्हाला अॅक्शन, इमोशन, ड्रामा आणि थ्रिलर असलेली एखादी दमदार गोष्ट पाहायची असेल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. केवळ 2 तास 20 मिनिटांची ही थरारक फिल्म एकाच वेळी तुम्हाला सगळं काही अनुभवायला लावणार आहे. जसं जसं सिनेमाची स्टोरी पुढे सरकते, तसं तसं ती प्रत्येक क्षणाला तुम्हाला ती पूर्ण पाहायला भाग पाडते.
हा सिनेमा कमी बजेटमध्ये बनवण्यात आलेला थ्रिलर आहे, पण असा की तो पाहून डोकं गरगरून जाईल आणि काळजात धस्स होईल. काल-ग्रह-नक्षत्र यांच्या जोडीने या सिनेमाचा क्लायमॅक्स इतका भन्नाट आहे, की तुम्हीही म्हणाल – "यार हे काय डोकं आहे!"
ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान यांच्यातील संघर्षाची झलक दाखवत, ही फिल्म प्रेक्षकाला हादरवून टाकते. या सिनेमातील शॉकिंग क्लायमॅक्स आणि माइंड ब्लोइंग ट्विस्ट्स यामुळे तो लक्षात राहील असा थरारपट ठरतो. ही फिल्म दुसरी तिसरी नसून अथर्व मुरली आणि निमिषा सजयन यांची "डीएनए" आहे.
ही कथा अशा दोन व्यक्तींवर आधारित आहे जे त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात मोठा संघर्ष सुरु आहे. दिव्याला थोडी मानसिक अडचण आहे, आणि आनंद पहिलं प्रेम गमावल्यानंतर स्वतःलाच हरवून बसला आहे. तो रिहॅब सेंटरमधून परततो आणि त्याचे आईवडील त्याचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतात. दिव्या आणि आनंदचं लग्न ठरतं.
लग्नाच्या दिवशी आनंदच्या मित्राला समजतं की दिव्या मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहे. तो हे लग्न थांबवायचा प्रयत्न करतो, पण हे सर्व जाणूनही आनंद दिव्याचा हात धरतो. लग्नानंतर दोघं खूप आनंदी असतात. एक दिवस त्यांच्या घरात बाळाचे हास्य ऐकायला मिळते... आणि त्याच दिवशी सगळं काही बदलून जातं. दिव्या दावा करते की त्यांचं नवजात बाळ बदललं आहे. सुरुवातीला आनंदला वाटतं की दिव्या भ्रमात आहे. पण हळूहळू तोही त्या भयानक सत्याशी सामना करतो, जे त्याच्या आत्म्याला हादरवून टाकतं.
जशी कथा पुढे सरकते, तशी यातून ज्योतिष, ग्रह-नक्षत्र, मनोवैज्ञानिक संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय बाल तस्करी सिंडिकेट यांचे थर एकामागोमाग एक उलगडत जातात. या चित्रपटात दाखवले आहे की सामाजिक पूर्वग्रह, विकृत मानसिकता, आणि स्त्रीने स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव यामुळे मातृत्वही संशयाच्या जाळ्यात उभं राहतं.
बॅकग्राऊंड स्कोअर सिनेमातील तणाव आणि थ्रिल अधिकच तीव्र करतो. तर सिनेमॅटोग्राफीमुळे प्रत्येक सीन व्हिज्युअली प्रभावी बनतो – मग तो रुग्णालयातील प्रसंग असो किंवा तपासाच्या रात्री. ही एक रहस्यमय थ्रिलर फिल्म आहे, जी शेवटी क्लायमॅक्समध्ये प्रेक्षकांना हादरवून टाकते.
फिल्मला BookMyShow वर 8.9 रेटिंग आणि IMDb वर 7.2 रेटिंग मिळाली आहे. थिएटरनंतर आता ही फिल्म OTT वर धुमाकूळ घालत आहे. नेल्सन वेंकटन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, आणि लोक त्यांचं खूप कौतुक करत आहेत.
इतर महत्त्त्वाच्या बातम्या