Influencer Tarini Peshawaria Shared Cannes Reality: 'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
Influencer Tarini Peshawaria Shared Cannes Red Carpet Reality: कान्सच्या या झगमगत्या जगापाठी, एक अंधारात बुडालेली दुनियासुद्धा आहे, याचा खुलासा एका इन्फुएन्सरनं केलाय. तिनं तिला या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना आलेल्या धक्कादायक अनुभवाबाबतही सांगितलं आहे.

Influencer Tarini Peshawaria Shared Cannes Red Carpet Reality: सध्या मनोरंजन विश्वात (Entertainment World) चर्चा सुरू आहे, ती कान्स फिल्म फेस्टिव्हलची (Cannes Film Festival). सोशल मीडिया तर अक्षरशः कान्स फेस्टिव्हलसंदर्भातील बातम्यांनी गजबजून गेलाय. कान्सच्या रेड कार्पेटवर (Cannes Red Carpet) कोण-कोण आलं? कुणी कोणता लूक केलेला? हे पाहण्याची उत्सुकता आपणा सर्वांनाच लागलेली असते. मग चमचमत्या ग्लॅमरस ड्रेसमधले त्यांचे लूक, त्यांचे आगळेवेगळे ड्रेसेस पाहण्यात अनेकांना मज्जा येते. पण, कान्सच्या या झगमगत्या जगापाठी, एक अंधारात बुडालेली दुनियासुद्धा आहे, याचा खुलासा एका इन्फुएन्सरनं केलाय. तिनं तिला या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना आलेल्या धक्कादायक अनुभवाबाबतही सांगितलं आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या झगमगाटात सहभागी होण्यासाठी किंमत मोजावी लागते, असा धक्कादायक खुलासा केला. अशी किंमत जे अनेकजण आपले फोटो काढून घेण्यासाठी किंवा रेड कार्पेटवर दिमाखदार एन्ट्री करण्यासाठी मोजतात. यावर्षी, जेव्हा आलिया भट्ट रेड कार्पेटवर अवतरली, तेव्हा तिचे असे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यांच्या आधारे सोशल मीडिया युजर्सनी असा दावा केला की, 'पपाराझी'नी तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. यावरुनच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तारिणी पेशावरिया (Tarini Peshawaria) हिनं कान्स फिल्म फेस्टिव्हलबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तारिणी पेशावरिया नेमकं काय म्हणाली?
कान्स फिल्म फेस्टिव्हलबाबत बोलताना तारिणी पेशावरिया (Tarini Peshawaria) म्हणाली की, "कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावणं जितकं सोपं दिसतं, तितकं ते अजिबात नाही. तिथे प्रत्येक गोष्टीसाठी मोठी किंमत मोजावी लागते. अनेक लोकांना असं वाटतं की, रेड कार्पेटवर चालताना आंतरराष्ट्रीय मीडियाचे फोटोग्राफर्स स्वतःहून तुमचे फोटो क्लिक करतात. पण सत्य पूर्णपणे वेगळं आहे..."
"तिथे उपस्थित असलेला प्रत्येक फोटोग्राफर तुमचे फोटो काढण्यासाठी थांबलेला नसतो. अनेक फोटोग्राफर्सना तुम्ही कोण आहात हे माहितही नसतं. जर तुम्हाला तुमचे फोटो हवे असतील, तर तुम्हाला फोटोग्राफर नेमावा लागतो, त्याला पैसे द्यावे लागतात. मी स्वतः 400 युरो (सुमारे 44,500 रुपये) फक्त 7 फोटो आणि 7 व्हिडिओ मिळवण्यासाठी दिले होते," असा धक्कादायक खुलासा तारिणी हिनं केला आहे.
View this post on Instagram
पुढे बोलताना तारिणी म्हणाली की, सोशल मीडियावर कान्समधल्या लूकचे फोटो तासन् तास चर्चेत असता. पण, प्रत्यक्षात मात्र इन्फ्लुएंसर्सना रेड कार्पेटवर फार कमी वेळ मिळतो. सर्वसामान्यांसाठी किंवा इन्फ्लुएंसर्ससाठी हे रेड कार्पेट केवळ 1 ते 2 मिनिटांचं असतं. तिथले सुरक्षारक्षक आणि आयोजक लोकांना अजिबात वेळ देत नाहीत आणि सतत पुढं जाण्यास सांगतात. पण, हेच ऐश्वर्या राय बच्चन आणि टॉम क्रूझ यांसारखे जागतिक दर्जाचे स्टार्स जेव्हा रेड कार्पेटवर येतात, तेव्हा संपूर्ण कार्पेट त्यांच्यासाठी रिकामं केलं जातं. ऐश्वर्या राय बच्चन, टॉम क्रूझच्या एन्ट्रीवेळी कडेकोट बंदोबस्त आणि सुरक्षेमुळे काही मिनिटांसाठी इतरांची एन्ट्री पूर्णपणे थांबवण्यात आली होती.
कान्समुळे हॉटेल्सची भाडीही गगनाला भिडतात
कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे फ्रान्समध्ये जगभरातील सेलिब्रिटींची मोठी मांदियाळी पाहायला मिळते. हॉटेल्सचे दर गगनाला भिडलेले असतात. सेलिब्रिटींचं आवडतं ठिकाण असलेल्या प्रसिद्ध 'हॉटेल मार्टिनेझ' (Hotel Martinez) बद्दल बोलताना तिनं सांगितलं की, महोत्सवाच्या काळात इथल्या एका रात्रीचं भाडं तब्बल 5 ते 10 लाख रुपये इतके असतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















