Actor and Influencer Sayak Chakraborty Video Viral alleges food swap: पश्चिम बंगालमधील अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सायक चक्रवर्ती याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका हॉटेल वेटरवर त्यानं गंभीर आरोप केले आहे. सायक चक्रवर्ती याने कोलकात्याच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटवर मटणऐवजी गोमांस दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानं आपल्या व्हिडिओतून याची माहिती दिली आहे. या व्हिडिओत तो हॉटेलमधील वेटरशी वाद घालत असल्याचं दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे नवा वाद निर्माण झाला असून, चक्रवर्ती याने या घटनेबाबत पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे. सध्या सायक चक्रवर्ती याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
सायक चक्रवर्ती याने एका व्हिडिओतून असा दावा केला की, त्याला एका रेस्टॉरंटमध्ये मटण ऐवजी गोमांस खायला देण्यात आले. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, वेटरने सायक आणि त्याच्या मैत्रिणीला मटण वाढले. त्यानं चुकून मटण समजून गोमांस खाल्ले. सायकला चवीमध्ये बदल जाणवल्यानंतर त्याला गोमांस खाल्ले असल्याचं समजलं. सायकने यासंदर्भात वेटरला जाब विचारला. त्यानं वेटरला जाब विचारत व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये वेटर माफी मागत असल्याचं दिसून येत आहे.
वृत्तानुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ कोलकात्यातील पार्क स्ट्रीटवरील एका रेस्टॉरंटमधील आहे. व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटचा वेटर आणि मॅनेजर सायकची माफी मागताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सायक ब्राह्मण असल्याचं सांगतो. तसेच या घटनेनंतर धार्मिक भावना दुखावल्या असल्याचं त्यानं सांगितलं. व्हिडिओमध्ये सायकने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. तसेच नंतर पार्क स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये वेटरविरूद्ध तक्रार दाखल केली.
सायक चक्रवर्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला काहींनी समर्थन दर्शवलं, तर काहींनी या व्हिडिओवर टीका केली. तर, काहींनी त्याला भाजपचा एजंट असल्याचं म्हटलं. वादानंतर सायकने व्हिडिओ डिलिट केला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वादानंतर सायकने नव्या व्हिडिओत म्हटलं की, "माझा उद्देश हिंदू मुस्लिम फूट पाडणे असा अजिबात नाही. माझे बरेच मुसलमान मित्र आहेत. मी त्यांच्या घरी जातो. त्यांच्यासोबत ईद साजरी करतो. मी तो पदार्थ चुकून खाल्ल्यामुळे माझा धर्म भ्रष्ट झालाय", असं त्यानं व्हिडिओत म्हटलं.
