Indrayani Colours Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Coloursc Marathi) इंद्रायणी (Indrayani) मालिकेत विठूच्या वाडीत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा रंगात आला असताना, वातावरणात अचानक एक नवा उत्साह आणि चर्चेची किनार निर्माण झाली. गावाच्या शाळेबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, काही जणांच्या चेहर्‍यावर आशा, तर काहींच्या चेहर्‍यावर संभ्रम स्पष्ट दिसत होता. एका बाजूला शिक्षणासाठीचा निर्धार, तर दुसरीकडे जुन्या समजुतींचा पगडा यामध्ये संपूर्ण गावच अडकलेले दिसत होते. मालिकेत इंदूचं गावात शाळा सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून त्यात मोहीतराव मिठाचा खडा टाकताना दिसणार आहे. ज्या जमिनीवर शाळा सुरु करण्यासाठी इंदू भूमी पूजन करणायचा निर्धार करते त्याला गावातील काही लोक विरोध करताना दिसणार आहेत. 

'भुताच्या मळावर शाळा सुरु करू देणार नाही...', असं म्हणत इंदूला थांबवताना दिसणार आहेत. त्यावर त्यांना आपली इंदू ठणकावून सांगणार आहे, शिक्षणाचं मंदिर तर इथेच उभां राहणार. अंधश्रद्धेला झुगारून, इंद्रायणी घडवणार शिक्षण क्रांती. अधूची साथ, व्यंकू महाराजांचा आशीर्वाद याच पाठबळ इंदू जवळ आहेच, पण या सगळ्यात ती गावकऱ्यांना इंदू कशी समजावणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

कार्यक्रमाच्या दरम्यान अनपेक्षित घोषणा झाल्यानं गावकर्‍यांमध्ये हलकासा खळबळजनक माहोल निर्माण होणार आहे. ज्या जमिनीवर शाळा बांधली जाणार आहे, तिच्या संदर्भात गावात आधीपासून अनेक कथा आणि समजुती फिरत असल्या तरी, काहींनी त्याकडे प्रगतीच्या संधी म्हणून पाहणार तर काही या निर्णयावर उघडपणे विरोध व्यक्त करताना दिसणार आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आपला पाठिंबा दर्शवत निर्धार अधिक मजबूत केला. त्याच वेळी, इतरांकडून होणारा कडक विरोधही वाढू लागणार आहे. वातावरणात घोषणांचा आवाज आणि तणावाची छाया असली तरी, पुढे काय होणार याबाबतची उत्सुकता सर्वांच्या नजरेत होती.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, गावातील दोन भिन्न विचारसरणी ठळकपणे समोर आल्या आहेत. एक गट इंद्रायणीच्या बाजूने शिक्षणासाठी काहीही करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरा गट मोहितराव सोबत जुन्या अंधश्रद्धांना धरून ठेवण्याच्या भूमिकेत ठाम आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आलेली ही घोषणा केवळ शिक्षणाच्या गरजेवर प्रकाश टाकत नाही, तर गावातील सामाजिक मानसिकतेवरही आरसा धरते. शिक्षणाच्या माध्यमातून अज्ञानाचा अंधार दूर करण्याच्या संकल्पाने प्रेरित झालेली इंद्रायणीची ही पावलं, पुढे जाऊन संपूर्ण गावाच्या विकासासाठी मोलाची ठरतील का, की विरोधाच्या लाटेत ही चळवळ अडकून पडेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या संघर्षातून उगवणारी नवी पहाटच कदाचित गावाच्या इतिहासात शिक्षण क्रांतीची सुरुवात ठरेल, जे इंदू कशी घडवून आणणार हे पहाणे रंजक असणार आहे.