Samay Raina Bihari Joke Row: 'इंडियाज गॉट लेटंट' (India's Got Latent) च्या दुसऱ्या सीझनमुळे समय रैना (Samay Raina) अलीकडेच चर्चेत आलाय. तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसतंय. शोच्या एका अलीकडील भागात समय रैनानं बिहारी आणि काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या टिप्पणीवरुन मोठा वाद निर्माण झालाय. समय रैनानं काही आक्षेपार्ह्य वक्तव्य केलीत, ही वक्तव्य त्यानं विनोदाच्या उद्देशानं केलेली असली तरी, त्यामुळे सोशल मीडियावर मोठी टीकेची राळ उठली आहे. अशातच आता समय रैनाच्या वक्तव्यावर, अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं असून, त्यांनी स्वतःच्या अनुभवातील एक प्रसंग सांगितला आहे. 

Continues below advertisement

अभिनेते मनोज वाजपेयी नेमकं काय म्हणाले? (Manoj Bajpayee On Samay Raina Joke)

'आयएएनएस' (IANS) शी बोलताना अभिनेते मनोज बाजपेयी यांनी समय रैनानं बिहारींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. मनोज वाजपेयी म्हणाले की, "जर हे सर्व केवळ विनोदाचा भाग असेल, तर मला काहीच अडचण नाही... आपण स्वतःवर आणि एकमेकांवर हसायला शिकलं पाहिजे. कोणाचंही मन न दुखावता किंवा नाराज न होता, आपण एकत्र हसलं पाहिजे..."

Continues below advertisement

इतकंच नाही, तर मनोज वाजपेयी पुढे बोलताना म्हणाले की, "आपल्याला स्वतःवर हसता आलं पाहिजे. पण त्याच वेळी, आपण आदराची भावनाही जपली पाहिजे, केवळ स्वतःबद्दलच नाही, तर आपण ज्यांच्यासोबत आहोत, त्या व्यक्तींबद्दल आणि त्या व्यक्तीच्या मूळ ठिकाणाबद्दलही, हे देखील महत्त्वाचं आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसोबत सहजतेनं वावरतात, तेव्हा त्या अनेकदा एकमेकांवर हसतात..."

मनोज वाजपेयींनी सांगितलेला एक किस्सा 

मनोज वाजपेयींनी दिल्लीत नव्यानं आल्यावर घडलेला एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं की, हे घडलं त्यावेळी ते साधारणतः 18 वर्षांचे होते. किस्सा सांगताना ते म्हणाले की, "मी 18 वर्षांचा असताना दिल्लीला आलेलो. एक दिवस, मी बसमध्ये पुढच्या दरवाज्यातून चढत होतो, कारण तो माझा पहिलाच अनुभव होता... मला शहरातील नियमांबाबत काहीच कल्पना नव्हती. तेव्हा ड्रायव्हरनं माझ्याकडे पाहिलं आणि मोठ्यानं ओरडून म्हणाला, 'अरे बिहारी, मागच्या दरवाज्यातून आत ये!"

"मी बिहारचा आहे हे त्या ड्रायव्हरला माहीत नव्हतं, जरी मी प्रत्यक्षात तिथलाच असलो तरी... त्यामुळे, त्याच्या मते, अशी चूक करणारी व्यक्ती बिहारचीच असणार... मला त्याचं काहीच वाटलं नाही, एक तर मी स्वतः बिहारी आहे म्हणून, आणि दुसरं म्हणजे, माझी काही चूक नव्हती... मी त्या शहरात नवीन होतो आणि तिथल्या पद्धतींशी अजून परिचित नव्हतो... मात्र, नंतर जेव्हा माझी इतर राज्यांतील लोकांशी मैत्री झाली, तेव्हा आम्ही एकमेकांच्या विशिष्ट सवयी आणि लकबींवर हसायचो..."

समय रैना नेमकं काय म्हणाला? (Samay Raina Bihari Joke Row)

समय रैना याच्याशी संबंधित वादाबद्दल बोलायचं झाल्यास, 'इंडियाज गॉट लेटंट 2' (India's Got Latent 2) च्या एका अलीकडील भागात शेरॉन वर्मा (Sharon Verma) आणि समय रैना यांनी एकमेकांच्या मूळ राज्यांबद्दल विनोदी पण आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या. कार्यक्रमादरम्यान, समय रैनानं शेरॉनची ओळख करून देताना ती बिहारची असल्याचं सांगितलं आणि मिश्किल पण, आक्षेपार्ह्य टिप्पणी केली.

तिथले लोक कदाचित 'इबोला' (Ebola) या शब्दाचा अर्थ 'ए बोला' (Ae Bola - एक बोलीभाषेतील वाक्प्रचार) असा समजू शकतात. शेरॉननंही काही कमी न करता समयच्या काश्मिरी असण्यावरून त्याला टोमणा मारला. त्यावर समय म्हणाला, "शेरॉन नोकरीच्या शोधात मुंबईला आली, हे अगदी नेहमीचंच 'बिहारी' वर्तन आहे." यावर शेरॉननं सडेतोड उत्तर दिलं आणि म्हणाली की, "किमान मी माझ्या राज्याचा त्याग स्वतःच्या मर्जीने केलाय..." या टिप्पण्यांवरून निर्माण झालेला वाद चांगलाच वाढलाय. त्यामुळे आता 'इंडियाज गॉट लेटंट'प्रमाणेच, समय रैनाचं 'इंडियाज गॉट लेटंट 2'सुद्धा वादाच्या भोवऱ्याच अडकलंय, असं म्हणायला हरकत नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Samay Raina India' Got Latent 2 Controversy: दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडून सत्कार अन् आता भाजपच्या नेत्यांकडून समय रैनाविरोधात तक्रार, 'इंडियाज गॉट लेटंट 2' मध्ये काय घडलं?