Indian Idol 16 Winner Odisha Jyotirmayee Nayak: नऊ महिने, शेकडो सुमधुर गाणी, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आणि असंख्य प्रार्थनांनंतर, 'इंडियन आयडॉल' (Indian Idol) सीझन 16 ला अखेर आपला नवा विजेता मिळाला आहे. ओदिशाहून आलेल्या ज्योतिर्मयी नायक (Jyotirmayee Nayak) हिनं शानदार विजय मिळवत 'इंडियन आयडॉल' 16 (Indian Idol 16) ची ट्रॉफी आपल्या नावे केली आणि 20 लाख रुपयांचं बक्षीसही जिंकलं. ग्रँड फिनालेमधील तिच्या दमदार परफॉर्मेंसनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. दरम्यान, जबलपूरचा तनिष्क शुक्ला (Tanishq Shukla) हा स्पर्धेत 'फर्स्ट रनर-अप' ठरला.

Continues below advertisement

'सैयां ओ सैयां' गाऊन जिंकली देशाची मनं (Indian Idol 16 Winner Jyotirmayee Nayak)

ग्रँड फिनालेमध्ये ज्योतिर्मयी हिनं 'सैयां ओ सैयां' हे गाणं अतिशय भावपूर्णरीत्या परफॉर्में केलं, ज्यामुळे संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं दुमदुमून गेलं. त्यानंतर तिला विजेती म्हणून घोषित करण्यात आलं आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. अंशिका चोनकर, मनराज वीर सिंह, मस्कम्मे बोसू, सुहेल सुफी आणि तनिष्क शुक्ला यांसारख्या तगड्या स्पर्धकांना मागे टाकत तिनं ही ट्रॉफी जिंकली आणि त्यावर स्वतःचं नाव कोरलं. 

Continues below advertisement

फक्त 'इंडियन आयडॉल' नाही... ओदिशाची प्रसिद्ध गायिका ज्योतिर्मयी नायक (Odisha Jyotirmayee Nayak)

ज्योतिर्मयी नायक हे नाव ओदिशा म्युझिक इंडस्ट्रीसाठी काही नवं नाही. पण, तिची ओळख फक्त गाण्यांपुरतीच मर्यादित नाही. 'इंडियन आयडॉल'मध्ये येण्यापूर्वीपासूनच ती म्युझिक थेरपीमार्फत कॅन्सर रुग्णांना मदत करते. ही तिच आहे जिनं, तिच्या आवाजासोबतच तिच्या कृतीतूनही लोकांची मनं जिंकली आहेत. 

हेमा मालिनीसुद्धा झालेल्या फॅन

'इंडियन आयडॉल'च्या संपूर्ण सीझनमध्ये ज्योतिर्मयी हिनं अनेक अविस्मरणीय परफॉर्मेंस दिलेत. तिनं जेव्हा "ओ जब तक है जान..." हे गाणं गायलेलं, तेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उठून उभं राहत तिचं कौतुक केलं. तसेच, "जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं" या गाण्यातील तिच्या परफॉर्मेंसनं अभिनेत्री लीना चंदावरकर इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांना ज्योतिमयीच्या आवाजात ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा झाली. या कार्यक्रमाचा 'ग्रँड फिनाले' अत्यंत नेत्रदीपक होता. शोचे परीक्षक श्रेया घोषाल आणि बादशाह यांच्यासोबतच उषा उत्थुप, उदित नारायण, पापन, कुमार सानू, शहनाज गिल आणि उर्मिला मातोंडकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली, ज्यामुळे ती संध्याकाळ खरोखरंच खास ठरली.

विजयानंतर ज्योतिमयी भावूक

ट्रॉफी जिंकल्यानंतर ज्योतिमयी हिनं हा क्षण म्हणजे, 'स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच' असल्याचं सांगितलं. ऑडिशन्सपासून ते ट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा हा प्रवास तिच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला. तिनं तिचं कुटुंब, चाहते, परीक्षक, शोची संपूर्ण टीम आणि ज्यांनी तिला मतदान केलं त्या सर्वांचे मनापासून आभार मानले. ती म्हणाली, "ही ट्रॉफी केवळ माझी नाही, तर ज्यांनी प्रत्येक टप्प्यावर मला साथ दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला, त्या सर्वांची आहे..."

'यादों की प्लेलिस्ट'सोबत संपला 'इंडियन आयडॉल 16'चा शानदार सीझन

'यादों की प्लेलिस्ट' थीमवर आधारित Indian Idol Season 16 नं सपूर्ण सीझनमध्ये जुन्या आणि सदाबहार गाणी नव्या आवाजातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. आता या आठवणींच्या प्रवासाचा अंत ज्योतिर्मयी नायक हिच्या विजयानं पूर्ण झालाय, जिनं सिद्ध केलंय की, मेहनत, निष्ठा आणि प्रतिभेच्या जोरावर कोणतंही स्वप्न साकार होऊ शकतं.