Seema Haider Video: पाकिस्तानमधून भारताच्या ग्रेटर नोएडा येथे आलेली सीमा हैदर गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असते. तिचा पती सचिन मीना याच्यासोबत ती सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Seema Haider Video) बनवत असते. सचिन आणि सीमा यांना मुलेही आहेत आणि संपूर्ण कुटुंब आनंदात आपले आयुष्य जगत आहे. यादरम्यान, सीमा हैदरने इंस्टाग्रामवर (Seema Haider Video) एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिच्या पती सचिनऐवजी बेडरूममध्ये तिच्या वकिलांचा एपी सिंह यांचा फोटो दिसत आहे. हे पाहून 'सचिन कुठे गेला?' असा सवाल लोक उपस्थित करत आहेत.(Seema Haider Video)
सीमा हैदरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती हिरव्या साडीत दिसत असून मागे बेड आहे. बेडरूममध्ये शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये तिचे वकील एपी सिंह यांचा फोटो अगदी बेडच्या वर असलेल्या जागेवर ठेवल्याचे दिसत आहे. एपी सिंह हे सचिन आणि सीमा हैदर यांच्या प्रकरणात दीर्घकाळापासून त्यांची बाजू मांडत आले आहेत. सीमा हैदर एपी सिंह यांना आपला भाऊ मानते. आता हा व्हिडिओ प्रचंड चर्चेचा विषय बनला आहे.
Seema Haider Video: 'तुझको मैंने ये दिल दे दिया'
सीमा या व्हिडिओमध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर 'तुझको मैंने ये दिल दे दिया... ओ पिया' हे गाणे वाजत आहे. तिच्या या लूकचे आणि अभिनयाचे (एक्सप्रेशन्स) कौतुक केले जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दहा हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेक जण कमेंट्स करत आहेत. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने वकिलांच्या फोटोकडे इशारा करत लिहिले आहे, "पीछे देखो पीछे."
दुसऱ्या एका युजरने कमेंट केली की, सीमा हैदर खूप सुंदर दिसत आहे. तर अनेक युझर्सनी मागे लावलेल्या एपी सिंह यांच्या फोटोचा आवर्जून उल्लेख केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून तो केवळ इंस्टाग्रामवरच नव्हे तर X (ट्विटर) वरही लोक शेअर करत आहेत.
Seema Haider Video: पबजी (PUBG) द्वारे झाली होती सीमा आणि सचिनची मैत्री
काही वर्षांपूर्वी सीमा हैदर आणि सचिन मीना यांनी भरपूर प्रसिद्धी मिळवली होती. दोघांची भेट 'पबजी' या गेमच्या माध्यमातून झाली होती. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि सीमा आपल्या मुलांसह नेपाळच्या मार्गाने भारतात आली. सीमाचा पाकिस्तानी पती दुबईत राहतो. भारतात आल्यानंतर सीमा सचिन मीनाच्या ग्रेटर नोएडा येथील गावात राहू लागली. हे दोघेही वेळोवेळी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असतात.
