Chhavi Mittal : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री छवी मित्तल  (Chhavi Mittal) ही तिच्या कॅन्सर लढ्यामुळे चर्चेत आहे.  छवी मित्तलवर 25 एप्रिल रोजी ब्रेस्ट कॅन्सरची अर्थात स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर छवी कॅन्सरमुक्त झाली आहे. छवी सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करुन लोकांना तिच्या कॅन्सर लढ्याबाबत माहिती देत आहे. पण एका नेटकऱ्यानं छवीला ट्रोल केलं आहे. या ट्रोलरच्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन छवीनं ट्रोलर करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 


नेटकऱ्यानं केलं ट्रोल
छवीनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये छवीनं कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतरच्या तिच्या पहिल्या रिअॅक्शनबाबत सांगितलं. या व्हिडीओला सुप्रिया नावाच्या एका युझरनं कमेंट केली, 'ओह, यामधून तू लोकांची सहानभूती मिळवत आहेस. तू स्वत:चा पीआर देखील करत आहेस.'


छवीनं दिलं सडेतोड उत्तर
छवीनं त्या युझरच्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन रिप्लाय दिला, 'ही कमेंट माझ्या पोस्टवर करण्यात आली आहे. त्या पोस्टमध्ये मी कॅन्सरबाबत लोकांना सांगत होते. सुप्रिया, मी कॅन्सरला निवडलं नाही तर कॅन्सरनं मला निवडलं आहे. ज्या भावनांमधून एक कॅन्सर रुग्ण जात असतो, त्या भावना तो शब्दामध्ये व्यक्त करु शकत नाही. आमच्या जवळच्या व्यक्तींनापण आमच्या भावना समजणं कठिण वाटतं. तू कॅन्सरशी लढा देणाऱ्या व्यक्तीला ट्रोल केलं आहेस, हे प्रशंसनीय आहे. मी तुझ्यासाठी प्रर्थना करते. तुला शांती मिळेल.  






पाहा छवीची पोस्ट
'कृष्णादासी', 'एक चुटकी आसमां', 'तुम्हारी दिशा' आणि 'तीन बहूरानियां' या मालिकांमध्ये छवीनं काम केलं आहे. तर छवीनं  'एक विवाह, ऐसा भी' या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 


हेही वाचा: