Hutatma Web Series:राज्यातील 29 महापालिका निवडणुकींपैकी मुंबई महानगरपालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. अशातच एका नव्या मु्द्द्यानं तोंड वर काढलं आहे. 2019 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारीत 'हुतात्मा' नावाची वेब सिरीजZEE5अॅपवरप्रदर्शित करण्यात आली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकूण 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. ही गोष्ट या सिरीजमधून मांडण्यात आली होती. या सिरीजमध्ये मराठीतील दिग्गज कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, आता ही सिरीजZEE 5 अॅपवरून हटवण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षकांनी रोष व्यक्त केला आहे. ही सिरीजZEE 5 अॅपवरून हटवल्यानंतर मनसे चित्रपट कर्मचारी सेनाध्यक्ष अमेय खोपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अमेय खोपकर नेमकं काय म्हणाले...?
अमेय खोपकर यांनी ट्विटरवर या चित्रपटाच्या निगडीत एक पोस्ट लिहिली होती. "2019मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीबाबत एक कठोर भाष्य करणारी एक वेब सिरीजZEE 5 अॅपवर आली होती. या सिरीजचा नाव हुतात्मा. या सिरीजमध्ये मराठी रक्त सळसळून उठेल असे काही प्रसंग दाखवण्यात आले होते. मात्र, ही सिरीज अचानक सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आली. ही सिरीजहटवण्यामागचं कारण काय? मराठी माणूस पेटून उठू नये, अशी इच्छा बाळगणाऱ्यांचे हे कारस्थान तर नाही ना? हे तपासावे लागेल", असं ट्विट त्यांनी केलं आहे.
सध्या अमेय खोपकर यांची पोस्ट सोशलमीडियातव्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खोपकर यांची ट्विटव्हायरल होताच अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मराठी माणसाला आपल्याला पूर्वजनांचा संघर्ष बलिदान आणि इतिहासाची माहिती असायला हवी. मुंबईमहाराष्ट्राला लढून मिळाली होती. ती आता लढूनच टिकवावी लागेल. हा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे", असं चित्रे म्हणाले. दरम्यान, ही बाब सोशलमीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, अनेक नेटकरी ‘हुतात्मा’ वेब सिरीजZEE5 वरून हटवण्यामागचे कारण काय? असा सवाल उपस्थित करत आहेत.
