hum saath saath hain fame neelam kothari : बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्रींना लग्न झाल्यानंतर सिनेसृष्टीत काम करता येत नाही. काही अभिनेत्री सुदैवाने आपलं सिनेक्षेत्रातील काम लग्न झाल्यानंतरही सुरु ठेवतात. मात्र, काही अभिनेत्रींना बाळांतपण किंवा घरातील दबावामुळे काम करणे थांबवावे लागते. अभिनेत्री नीलम कोठारी नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या करिअरमध्ये त्यांनी सलमान खान, अक्षय कुमार आणि गोविंदा यांसारख्या सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केलं. मात्र आता त्या मोठ्या पडद्यावर दिसत नाहीत. तरीदेखील नीलम चर्चेत कायम राहतात. लग्नानंतर सिनेक्षेत्रात काम करण्यास मनाई करण्यात आल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. 

अभिनेत्री नीलम कोठारी सध्या तिचं आयुष्य मजेत घालवत आहे. तिने इंग्लंडमधील बिझनेसमन ऋषी सेठिया यांच्याशी लग्न केलं होतं. वृत्तांनुसार ऋषी सेठिया यांची 65,000 कोटींची संपत्ती आहे. नीलमने 2000 साली ऋषीसोबत आलिशान विवाह केला होता. मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकले नाही आणि 2002 मध्ये या दाम्पत्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर नीलम भारतात परत आल्या.

मुलीला घटस्फोटाबद्दल सांगितलं नव्हतं

यानंतर नीलमच्या आयुष्यात टीव्ही अभिनेता समीर सोनी आले. या दाम्पत्याने 2011 मध्ये सात फेरे घेतले. 2013 मध्ये त्यांनी आहना नावाची एक मुलगी दत्तक घेतली. नीलमने आपल्या मुलीला कधीही पहिल्या लग्नाबद्दल सांगितलं नव्हतं.

नीलमचा वेदनादायक अनुभव

जेव्हा नीलम ‘फॅब्युलस लाईव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाइव्ज’ च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसल्या तेव्हा त्यांनी एकता कपूरशी बोलताना सांगितलं की, त्यांच्या मुलीला आहनाला गुगलच्या माध्यमातून त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल समजलं होतं. नीलम म्हणाल्या की त्या योग्य वेळ येईल तेव्हा स्वतःच मुलीला याबद्दल सांगणार होत्या. पण तिला अशा पद्धतीने कळल्यामुळे ती खूप रडली. या काळात नीलमने हेही उघड केलं की ऋषी सेठियाशी लग्न करताना त्या स्वतःला हरवल्या होत्या. अभिनेत्रीने सांगितलं की त्यांना भारतीय कपडे घालण्यापासून ते चित्रपटांमध्ये काम करण्यापर्यंत सगळ्यावर बंधनं घालण्यात आली होती. इतकंच नव्हे तर नाव बदलण्याचा दबावदेखील टाकण्यात आला होता. नीलमने सुरुवातीला लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र जेव्हा वेदना सहन करता आल्या नाहीत तेव्हा त्यांनी घटस्फोट घेतला.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पाल दिसली की घाबरणाऱ्यांनो, आमच्या नगरीत दोन अजगर सापडले, अवधूत गुप्तेंची पोस्ट नेमकी काय?

'पीछे देखो पीछे फेम' बाल कलाकाराच्या छोट्या भावाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन; 2023 मध्ये झालेला बहिणीचा मृत्यू