Saba Azad hospitalised due to infection: बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik roshan) आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद नेहमीच चर्चेत असतात. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे कपल सोशल मीडियावर नियमितपणे त्यांच्या खासगी क्षणांचे फोटो शेअर करतात. मात्र, 14 दिवसांपासून असे काही घडले नाही. दोघांनीही कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सबा आझाद (Saba Azaad) सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. आपल्या प्रकृती विषयी माहिती देताना तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या कठीण काळात सबा आझादसोबत ह्रतिक रोशन भक्कमपणे उभा आहे. सध्या सबा आझादची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सबा आझाद सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. पोस्टद्वारे ती आपल्या चाहत्यांसह कनेक्टेड असते. नुकतंच तिनं एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या फोटोमध्ये सबा हॉस्पिटलच्या बेडवर आराम करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत सबाने एक कॅप्शन देखील दिलं आहे. 'माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस. साइक्लोस्पोरा कॅटेनेन्सिस, हे किती भयंकर आहे. मी नेहमी घरातील जेवण खाते. तसेच कोमट पाणी पिते. तरी देखील मला पोटाच्या इन्फेक्शनचा त्रास झाला', असं सबा म्हणाली.
'माझे आधीच वजन कमी होते. त्यात दोन आठवड्यात माझे 4 किलो वजन कमी झाले. मी आता व्यवस्थित चालू देखील शकत नाही. जर दिवसभरात कधीही व्यायाम केला तर, दुसऱ्या दिवशी माझे वजन अर्धा किलोने कमी होते. आता वेट लिफ्टिंग तर दुरच, टुथपिक उचलणंही अशक्य होत आहे', असंही सबा म्हणाली. 'म्हणून कृपया. तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी भाजीपाल्या धुवून खा. कारण यावर आपले आयुष्य अवलंबून आहे', असं सल्ला सबाने सर्वांना दिला.
अशा कठीण काळात ह्रतिक रोशन सबा आझादच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तिनं पोस्टमध्ये सांगितलं की, 'हा फोटो देखील ह्रतिकनेच क्लिक केला आहे. त्यांनी माझ्या चिडचिडी मुडला कायम हसतं खेळतं करण्याचा प्रयत्न केला. टीप - मी इथे दिसत आहे, तितकी लहान नाही. बेड खूप मोठा आहे. तसेच अँगलही मोठा आहे, असं सबाने स्पष्ट केलं.
