housefull 5 teaser released : ​बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटांची विनोदी सिरीज असलेल्या 'हाऊसफुल 5'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हाऊसफुल 5 चा ट्रेलर आज (दि.30) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, संजय दत्त यांच्यासह 18 जणांची तगडी स्टार कास्ट असणार आहे. दरम्यान, हा सिनेमात विनोद कमी पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कारण सिनेमा एका मर्डर मिस्ट्रीवर बनवण्यात आलाय. 






'हाऊसफुल 5'चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले असून, या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फर्दीन खान, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फखरी, संजय दत्त, जॉनी लिव्हर, नाना पाटेकर, चंकी पांडे, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, चित्रांगदा सिंग, रणजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर यांच्यासह एकूण 18 कलाकारांचा समावेश आहे . या भव्य कलाकारांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.​


हाऊसफुल 5 च्या टीझरने चाहत्यांची उत्सकता वाढवली आहे. सोशल मीडियावर हाऊसफुल 5 च्या टीझरला तुफान प्रतिसाद मिळतोय. या टीझरमध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख विनोदी अंदाजात दिसत आहेत. याशिवाय संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, डिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लीवर, श्रेयस तलपदे, निकितिन धीर, रंजीत, आकाशदीप साबिर, जैकलीन फर्नांडिस, नर्गिस फखरी, चित्रांगदा सिंह आणि सौंदर्या शर्मा असे 18 दिग्गज कलाकारही दिसत आहेत. टीझरमध्ये सर्व स्टार एका क्रूझमध्ये दिसत आहेत. ही स्टोरी एका मर्डर केस भोवती फिरताना दिसणार आहेत. कॉमेडी, सस्पेन्ससह, मर्डरचा थरार प्रेक्षकांना हाऊसफुल 5 मध्ये पाहायला मिळणार आहे. 


'हाऊसफुल 5' ची संपूर्ण स्टोरी एका क्रूझ म्हणजेच जहाजावर पाहायला मिळणार आहे., जिथे हत्येचे रहस्य देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. टीझरवरून असे दिसून येते की, क्रूझवरील प्रत्येक पात्र हत्येतील संशयित असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ हे पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसू शकतात जे हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतील.


 









इतर महत्वाच्या बातम्या 


VIDEO : रितेश देशमुखने 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या लोगोसाठी आवाहन करताच 10 हजारांपेक्षा जास्त मेल, इन्स्टाग्राम स्टोरीला केले शेअर