Housefull 5 Box Office Collection Day 9: 'हाऊसफुल 5' (Housefull 5) हा चित्रपट 6 जून रोजी प्रदर्शित झाला. अक्षय कुमार (Akshay Kumar), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांच्यासह 19 कलाकारांचा समावेश असलेला हा चित्रपट आज दुसऱ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) दाखल झाला आहे. या चित्रपटानं सुरुवातीच्या दिवसांत एकामागून एक मोठे रेकॉर्ड मोडलेत.
दरम्यान, विकेंड गाजवणाऱ्या 'हाऊसफुल्ल 5'ची कमाई विकडेजमध्ये मात्र थोडी कमी झाली. सिनेमाच्या नवव्या दिवशी चित्रपट रिलीजनंतरच्या दुसऱ्या शनिवारी कमाई करत आहे, त्यामुळे जाणून घेऊयात सिनेमानं कोणते नवे रेकॉर्ड रचलेत?
'हाऊसफुल 5'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
मेकर्सनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 8 दिवसांत चित्रपटानं किती कमाई केली आणि सॅकनिल्कवर उपलब्ध आकडेवारीनुसार फिल्मनं किती कमाई केली? याची माहिती खालील तक्क्यांमध्ये दिली आहे. अशातच सिनेमाच्या नवव्या दिवसाचा आकडा सकाळी 10.50 वाजेपर्यंतचा आहे, त्यात बदल होऊ शकतात.
| दिवस | बॉक्स ऑफिस कलेक्शन (कोट्यवधींमध्ये) |
| दिवस 1 | 24.35 |
| दिवस 2 | 32.38 |
| दिवस 3 | 35.10 |
| दिवस 4 | 13.15 |
| दिवस 5 | 11.70 |
| दिवस 6 | 9.40 |
| दिवस 7 | 7.50 |
| दिवस 8 | 6.60 |
| दिवस 9 | 9 |
| एकूण | 149.18 |
'हाऊसफुल 5' च्या आजच्या कमाईत झालेली वाढ पाहता, असं दिसतंय की, हा चित्रपट लवकरच 'रेड 2' चा विक्रम मोडू शकतो, जो 'छावा' नंतर या वर्षीचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. अजय देवगणच्या चित्रपटानं आतापर्यंत भारतात 171.35 कोटी रुपये कमवले आहेत. म्हणजेच, हा विक्रम मोडण्यासाठी चित्रपटाला सुमारे 22 कोटी रुपये अधिक कमवावे लागतील.
अक्षय कुमारच्या टॉप 10 चित्रपटांमध्ये 'हाऊसफुल 5'
अक्षय कुमारच्या कारकिर्दीतील टॉप 10 चित्रपटांवर नजर टाकल्यास, 'हाऊसफुल 5' या यादीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे आणि आता लवकरच तो ओएमजी 2 चा रेकॉर्ड मोडणार आहे.
- हाऊसफुल 4 : 206 कोटी
- गुड न्यूज : 201.14 कोटी
- मिशन मंगल : 200.16 कोटी
- सूर्यवंशी : 195.04 कोटी
- 2.0 (हिंदी) : 188 कोटी
- केसरी : 153 कोटी
- ओएमजी 2 : 150 कोटी
- हाऊसफुल 5 : 143.15 कोटी
- स्काय फोर्स : 134.93 कोटी
- टॉयलेट एक प्रेम कथा : 133.60 कोटी
'हाऊसफुल 5'चं बजेट आणि वर्ल्डवाइड कमाई
सॅकनिल्कनं दिलेल्या आकडेवारीनुसार, 'हाऊसफुल 5' जवळपास 225 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये प्रिंट आणि अॅडव्हर्टायजमेंटच्या कॉस्टचा समावेश आहे. दरम्यान, फिल्मनं 8 दिवसांत सॅकनिल्कनुसार, वर्ल्डवाइड 204 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे.
दरम्यान, 'हाऊसफुल 5' ची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांच्या प्रोडक्शन हाऊसनं केली आहे. तरुण मनसुखानीच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या 'हाऊसफुल 5' मध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नाना पाटेकर, संजय दत्त, डिनो मोरिया, फरदीन खान यांच्यासह तब्बल 19 कलाकार एकत्र झळकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
286 आठवडे थिअटरमध्ये हाऊसफुल होता शोले सिनेमा; बजेट किती होतं? कमाई किती केली?