Horror Suspense Thriller Web Series: बॉलिवूड प्रेक्षकांमध्ये नेहमीच हॉरर चित्रपटांची (Horror Movies) मोठी क्रेझ पाहायला मिळते. एखादा हॉरर-थ्रिलर चित्रपट (Horror-Thriller Movies) आला तर, तो हिट झालाच म्हणून समजा. पण, कोरोना काळापासून प्रेक्षक थिएटर्सपासून ओटीटीकडे वळले आहेत. हळूहळू लोकांना सीरिजचं इतकं व्यसन लागलं आहे की, हळूहळू चित्रपटांबाबतची क्रेझ कमी होऊन आता ओटीटी सीरिजची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा ओघ पाहता निर्मात्यांनीही अनेक दमदार स्क्रिप्ट्स सीरिजच्या स्वरुपात पडद्यावर उतरवण्यास सुरुवात केली आहे.  तर, अनेक निर्माते सिनेमेदेखील ओटीटीवरच रिलीज करू लागले आहेत. 

साधारणतः सात वर्षांपूर्वी ज्यावेळी ओटीटीची क्रेझ शिगेला पोहोचलेली नव्हती, त्यावेळी अभिनेत्री राधिका आपटेची एक हॉरर-थ्रिलर सीरिज आली होती. या सीरिजनं प्रेक्षकांना पुरतं हादरवून सोडलं होतं. पण, तुम्हाला कदाचितच हे ठाऊक असेल की, सीरिजच्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर आलेली 'घोल' (Ghoul) ही वेब सीरिज आधी चित्रपटाच्या स्वरुपात बनवण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतला होता. पण, शुटिंगवेळी एवढे लांबलचक सीन्स शूट झाले की, त्यानंतर निर्मात्यांनी 45-45 मिनिटांचे तीन एपिसोड्स करून वेब सीरिज रिलीज केली. 

सस्पेन्सचा मसाला, थरकाप उडवणारे सीन्स 

राधिका आपटे, मानव कौल, रत्नाबली भट्टाचार्जी, महेश बलराज स्टारर मिनी वेब सीरीज 'घोल'ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या वेब सीरिजला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. दिग्दर्शक पॅट्रिक ग्राहम यांनी या सीरिजची दिग्दर्शन केलं आहे. तर, याची पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. तीन एपिसोड्सची या सीरिजची सुरुवातच सस्पेन्सनं होते. ही कहाणी मिलिट्री बंकरच्या आसपास फिरते.  

राधिका आपटे करते रहस्यमयी मृत्यूतांडवाचा खुलासा 

एका मिलिट्री बंकरमध्ये दहशतवाद्यांना बंदी बनवून ठेवलं जातं. पण, सर्वात आधी या बंकरमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. आता मिलिट्रीचे लोक या बंकरचा पर्दाफाश करण्यासाठी आणि यामध्ये होणाऱ्या रहस्यमयी मृत्यूतांडवाचं सत्य समोर आणण्याच्या प्रयत्नात आहेत. राधिका आपटे सीरिजमध्ये मिलिट्री ऑफिसरच्या भूमिकेत दिसली आहे. 'घोल' पहिल्या एपिसोडपासूनच सर्वांना खिळवून ठेवते, पण त्यानंतर हळूहळू जशी कथा पुढे सरकते, कित्येक हादरवणाऱ्या गोष्टींचा खळबळजनक खुलासा होऊ लागतो. 

मिळवलंय धमाकेदार imDb रेटिंग

'घोल'ची कहाणी जेवढी भयावह आहे, तेवढीच स्टारकास्ट भारी आहे. सीरिजमधील स्टार्सनी आपल्या दमदार अभिनयानं यामध्ये जीव ओतला आहे. सीरिजमधील भन्नाट कथानक आणि डार्क विजुअल हॉरर एलिमेंट वाढवतात आणि प्रेक्षकांना घरी भयावह स्थितीत सोडतात. त्यांच्या डार्क विजुअलसह, बॅकग्राउंड म्युझिक देखील प्रेक्षकांवर जबरदस्त प्रभाव पाडतं. 2018 मध्ये आलेली 'घोल' ही मिनी वेब सिरीज आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे आणि तिचं आयएमडीबी रेटिंग 7 आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा