Horror Film Box Office Earning 3140 Crore: जगभरातील हॉरर फिल्म्सच्या (Horror Films) चाहत्यांसाठी 'द कॉन्ज्युरिंग' (The Conjuring) सीरिज नेहमीच पर्वणी ठरली आहे. या सीरिजचा प्रत्येक नवा भाग प्रदर्शित होताच, चित्रपटगृहांमध्ये भीती आणि उत्साहाची लाट पसरते. आता, फ्रँचायझीचा शेवटचा भाग, 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रीट्स' प्रदर्शित झाला आहे आणि तो जबरदस्त हिट झाला आहे. 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं रिलीजचे 15 दिवस पूर्ण केले आहेत आणि बॉक्स ऑफिसवर आधीच धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत जागतिक बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 355 मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे.
'द कॉन्ज्युरिंग' चित्रपटानं जगभरात 31.4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाचं बजेट फक्त 55 दशलक्ष डॉलर्स (484 कोटी) होतं, म्हणजेच, त्यानं त्याच्या सुरुवातीच्या बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त कमाई केली आहे. कमाईचा हा सिलसिला सुरूच आहे आणि चाहत्यांना वाटतं की, तो 500 मिलियन डॉलर्सचा टप्पा सहज ओलांडू शकतो.
जगभरात हिट, बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई
'द कॉन्ज्युरिंग' सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम आहे. काहींना हा सिनेमा इतर पार्ट्सपेक्षा फारसा चांगला वाटला नाही. पण, तरीही त्याच्या एकंदरीत बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन तो वर्षातला सर्वात हिट सिनेमा ठरला आहे. एका यजुरनं लिहिलंय की, " मजेशीर आहे... फ्रँचायझीमधील सर्वोत्तम सिनेमा आहे." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "हा सिनेमा निश्चितच 500 मिलियन डॉलर आहे..."
दमदार स्टारकास्ट, उत्कृष्ट दिग्दर्शन...
चित्रपटाचं हृदय त्याच्या स्टार कास्टमध्ये आहे. पॅट्रिक विल्सन, वेरा फार्मिगा, मिया टॉमलिन्सन आणि बेन हार्डी यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. दिग्दर्शन मायकेल चावेस यांनी केलं आहे, जे भय आणि थरार उत्कृष्टपणे सादर करतात. येत्या काळात चित्रपट किती कमाई करतो हे पाहणं बाकी आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे. 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रीट्स' हा हॉरर चित्रपट एक मेजवानी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :