Hombale Films Big Announcement : गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे देशातील सर्वात मोठे प्रॉडक्शन हाऊस ‘होम्बळे फिल्म्स’ (Hombale Films) आता मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त सरप्राईज घेऊन आले आहे. विविध संस्कृती आणि भाषांमध्ये आपल्या दर्जेदार कथांचा विस्तार करताना, या बिग बॅनरने आता अधिकृतपणे आपल्या पहिल्या मराठी हिप-हॉप म्युझिकल चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘येतो का नाय’ (Yeto Ka Naay) असे या चित्रपटाचे नाव असून, निर्मात्यांनी या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या “YKN - पहिला वार” या शीर्षकाचीही घोषणा केली आहे. 

तरुणांची संस्कृती, रिदम, रॅप म्युझिक, भावना आणि वास्तवाने भरलेली ही एक ऊर्जावान म्युझिकल जर्नी असणार आहे, ज्याची मूळ कथा स्वप्नांच्या शहर मुंबईच्या (Mumbai) पार्श्वभूमीवर आधारित आहे.

प्रादेशिक कथांना मिळणार जागतिक व्यासपीठ

वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रींमध्ये सातत्याने यशाचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत असलेल्या ‘होम्बळे फिल्म्स’ने भारतातील आघाडीच्या कंटेंट-ड्रिव्हन प्रॉडक्शन बॅनर्समध्ये स्वतःची मजबूत आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणतीही प्रादेशिक कथा तिच्या मूळ भावनिक आणि सांस्कृतिक मुळांसह अत्यंत भव्य आणि सिनेमॅटिक स्तरावर मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी हे बॅनर जगभर ओळखले जाते. आता हाच भव्यपणा मराठी सिनेमालाही (Marathi Cinema) अनुभवायला मिळणार आहे.

सारंग साठे करणार दिग्दर्शन, दिग्गज कलाकार एकत्र

विजय किरगंदूर (Vijay Kirgandur) निर्मित ‘येतो का नाय’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठी डिजिटल विश्वातील प्रसिद्ध नाव सारंग संजीव साठे (Sarang Sathe) सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाची कथा सारंग संजीव साठे, सुजॉय जाधव यांच्यासह रॅपर सृष्टी तावडे (Srushti Tawde) आणि श्रेयस सगवेकर यांनी एकत्र मिळून लिहिली आहे. त्यामुळे यात अस्सल हिप-हॉप संस्कृती पाहायला मिळणार आहे. 

चित्रपटाच्या उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी हर्षवीर ओबेरॉय यांनी सांभाळली असून, त्याला सुप्रसिद्ध संगीतकार एवी प्रफुल्लचंद्र (AV Prafullachandra) यांनी संगीत दिले आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये वेगाने सुरू असून, याच वर्षी 2026 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तरुणांच्या भावनांचा अनोखा प्रवास

मराठी हिप-हॉप (Marathi Hip-Hop) संस्कृतीच्या भन्नाट आणि जबरदस्त वाइबसह आजच्या तरुणांच्या भावना, मैत्री, प्रेम, संघर्ष, स्वतःची ओळख आणि गल्लीबोळातील टॅलेंट शोधण्याच्या प्रवासाला उलगडणारा ‘येतो का नाय’ हा चित्रपट होम्बळे फिल्म्ससाठी एक नवा आणि अत्यंत महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हे प्रॉडक्शन हाऊस भारताच्या विविध भागांतील वेगवेगळ्या कलाकारांना आणि अंडरग्राउंड आवाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या आपल्या प्रयत्नांना पुढे नेत आहे.

भारतीय सिनेमाचा चेहरामोहरा बदलणारे बॅनर

होम्बळे फिल्म्स हे ‘के.जी.एफ.: चॅप्टर 1 ’, ‘के.जी.एफ.: चॅप्टर 2, ‘कांतारा’, 'सालार: पार्ट 1 - सीजफायर' आणि ‘महावतार नरसिंह’ सारख्या ब्लॉकबस्टर आणि पॅन-इंडिया फ्रँचायझी देणारे एक अत्यंत प्रभावी आणि यशस्वी प्रॉडक्शन बॅनर आहे. आपल्या भव्य चित्रपटांद्वारे या प्रॉडक्शन हाऊसने भारतीय सिनेमाची व्याख्या बदलली असून बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचे योगदान दिले आहे. 

नुकत्याच आलेल्या ‘महावतार नरसिंह’ सारख्या चित्रपटाद्वारे त्यांनी भारतीय संस्कृतीची मुळे जपत देशातील उत्कृष्ट ॲनिमेशनपट सादर केला, ज्यामुळे भारतीय ॲनिमेशनला जागतिक स्तरावर नवी उंची मिळाली. गेल्या काही वर्षांत या कंपनीने कन्नडसह तेलगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमातही आपली मजबूत पकड निर्माण केली असून आता मराठीतही इतिहास रचण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

ही बातमी वाचा: