एक्स्प्लोर

Hollywood Director Christopher Nolan Movies: 28 वर्षांत 13 सिनेमे, 51,000 कोटींचं कलेक्‍शन; या सुपरहिट दिग्दर्शकाचे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर पाहिलेत?

2015 मध्ये 'टाईम' मासिकाने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला, तर 2024 मध्ये त्यांना 'नाईट' ही मानाची पदवी देण्यात आली.

Hollywood Director Christopher Nolan Movies: हॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) यांचा बहुप्रतिक्षित 'द ओडिसी' (The Odyssey) हा चित्रपट 17 जुलै 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नोलन यांच्या कारकिर्दीची चर्चा रंगली आहे. अवघ्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत  13 चित्रपट दिग्दर्शित करूनही त्यांनी जगभरात 6.1 अब्ज डॉलर्स म्हणजे  सुमारे 51 हजार कोटी इतकी कमाई केली आहे.

सिनेविश्वातील सर्वात प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक

30 जुलै 1970 रोजी जन्मलेले ख्रिस्तोफर एडवर्ड नोलन हे ब्रिटिश-अमेरिकन लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. गुंतागुंतीच्या कथा, वेगळं कथन आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी मांडणी ही त्यांची खास ओळख आहे. आजपर्यंत त्यांनी 2 ऑस्कर, 2 बाफ्टा आणि 1 गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावले आहेत. त्याचबरोबर त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी नामांकनही मिळालं आहे. 2015 मध्ये 'टाईम' मासिकाने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला, तर 2024 मध्ये त्यांना 'नाईट' ही मानाची पदवी देण्यात आली.

नोलन यांच्या चित्रपटांची जगभरात कोट्यवधींची कमाई

ख्रिस्तोफर नोलन यांचे चित्रपट केवळ समीक्षकांच्याच नव्हे, तर बॉक्स ऑफिसवरही तुफान यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या सर्व चित्रपटांनी मिळून आतापर्यंत 6.1 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 51 हजार कोटी इतकी कमाई केली आहे.

द डार्क नाईट रायझेस (2012) : 1.085 अब्ज डॉलर (सुमारे 9,070 कोटी)

द डार्क नाईट (2008) : 1.004 अब्ज डॉलर (सुमारे 8,390 कोटी)

ओपेनहायमर (2023) : 976 दशलक्ष डॉलर (सुमारे 8,160 कोटी)

इन्सेप्शन (2010) :836 दशलक्ष डॉलर (सुमारे 6,990 कोटी)

इंटरस्टेलर (2014): 773 दशलक्ष डॉलर (सुमारे 6,460 कोटी)

लहानपणापासूनच चित्रपटनिर्मितीची आवड

नोलन यांनी लहान वयातच लघुपट बनवण्यास सुरुवात केली होती. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे इंग्रजी साहित्याचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म्स तयार केल्या.1998 मध्ये 'Following' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर 'Memento' (2000) या चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेच्या ऑस्कर नामांकनाचाही मान मिळाला.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget