Holiday Declared For Rajinikanth 400 Crore Film Coolie: 400 कोटींची फिल्म रिलीज झाल्यानंतर सुट्टीची घोषणा; 4500 रुपयांना विकलं गेलं एक तिकीट; अनाथालय, वृद्धाश्रमांमध्ये करण्यात आलेलं अन्नदान
Holiday Declared For Rajinikanth 400 Crore Film Coolie: रजनिकांत यांच्या फिल्मचा उत्साह चाहत्यांमध्ये एवढा शिगेला पोहोचलेला की, या फिल्म्सची तिकीटं 4 हजार 500 रुपयांना विकण्यात आलेली.

Holiday Declared For Rajinikanth 400 Crore Film Coolie: जेव्हा गोष्ट रजनिकांत (Rajinikanth) यांची असते, त्यावेळी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. या दिग्गज सुपरस्टारची फिल्म 'कुली' (Film Coolie) 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाली आणि त्यासोबतच प्रेक्षकांचा उत्साह देखील शिगेला पोहोचलेला. यासाठी एका कंपनीनं चक्क आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केलेली. एवढंच नाहीतर आपल्या प्रत्येक ब्रांचमध्ये त्यांनी मोफत तिकीटंही वाटलेली. रजनिकांत यांच्या फिल्मचा उत्साह चाहत्यांमध्ये एवढा शिगेला पोहोचलेला की, या फिल्म्सची तिकीटं 4 हजार 500 रुपयांना विकण्यात आलेली.
कंपनीनं सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की, "सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांच्या 'कुली' चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे, मानव संसाधन विभागाकडे येणाऱ्या रजेच्या विनंत्यांचा पूर टाळण्यासाठी आम्ही 14 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. आम्ही अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना अन्नदान करून, जनतेला मिठाई वाटून आणि युनो अॅक्वा कर्मचाऱ्यांना मोफत 'कुली' सिनेमाची तिकिटं देऊन एंटी-पायरेसीच्या प्रयत्नांना पाठिंबा देत रजनीकांत यांचा 50 वा वर्धापन दिन साजरा केला..."
फिल्म रिलीजच्या दिवशी सुट्टीची घोषणा
यामध्ये पुढे म्हटलंय की, कंपनीची ही ऑफर त्यांच्या चेन्नई, बंगळुरू, त्रिची, तिरुनेलवेली, चेंगलपट्टू, मट्टुथवानी आणि अरापलायमसह सर्व ब्रांचमध्ये लागू करण्यात आलेली. मिडिया रिपोर्टनुसार, सिंगापूर स्थित एका कंपनीनं आपल्या तमिळ कर्मचाऱ्यांसाठी 'कुली' सिनेमाच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी फिल्म पाहण्यासाठी पेड लीव्हची घोषणा केलेली.
4,500 रुपांमध्ये विकलेली तिकीटं
या दरम्यान, चेन्नईतील लोकप्रिय थिएटरनं तिकीटांची किंमत 4,500 रुपये ठेवली. रजनीकांत यांचा एक चाहता प्रभाकरनं इंडिया टुडे डिजिटलला सांगितलं की, "मी चेन्नईच्या सर्व लोकप्रिय थिएटर्समध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. सर्व तिकीटांच्या किमती 600 रुपये, 1,000 रुपये आहे, ज्यामध्ये सर्वाधिक 4,500 रुपये आहे. मी पहिल्या शोसाठी तिकीट अॅप्समार्फत तिकीट बुक करू शकलो नाही, कारण त्या ब्लॉक आहेत किंवा विकल्या गेल्या आहेत. माझ्यासारख्या फॅन्सकडे ब्लॅकमध्ये तिकीट खरेदी करणं किंवा नॉर्मल दरांवर तिकीटं खरेदी करण्यासाठी फर्स्ट शो संपण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही..."
'कुली'ची रिलीज डेट
'कुली' सिनेमाची रिलीज डेट रजनिकांत यांच्या सिनेमामध्ये 50 वर्ष पूर्ण होण्यासोबत सुरू झालेली. ज्यामुळे 14 ऑगस्ट फक्त फिल्म रिलीज होण्यापेक्षाही कित्येक पटींनी जास्त होता. हा चाहत्यांसाठी एक उत्सव होता. चॅरिटी ड्राइव्हपासून मोफत तिकीटं वाटण्यापर्यंत, रजनीकांतच्या चाहत्यांनी काय नाही केलं.
'कुली'ची स्टारकास्ट
केरळ आणि कर्नाटकात काही मोजक्या थिएटर्समध्ये 14 ऑगस्टला सकाळी 6 वाजताच्या शोपासून फिल्मच्या स्क्रिनिंगला सुरुवात झाली. दरम्यान, तामिळनाडूमध्ये स्थानिक नियमांमुळे चाहत्यांना पहिली शो सकाळी 9 वाजता पाहावा लागला. रजनिकांत यांच्यान्यतिरिक्त 'कुली'मध्ये नागार्जुन, सत्यराज, आमिर खान, उपेंद्र, सौबिन शाहीर आणि श्रुति हासन यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे.


















