Historic BJP Victory in West Bengal: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग  आला आहे. काल पश्चिम बंगालमधील विधानसभा (Election) निवडणुकींची मतमोजणी प्रक्रिया  पार पडली. मतांचे कल तृणमूल काँग्रेसच्या बाजूने नसून, बीजेपीच्या बाजूने दिसले. पहिल्यांदाच पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी 207 जागांवर भाजपने घवघवीत विजय मिळवला. दरम्यान, गेली 15 वर्षे ज्यांनी सत्ता गाजवली, त्या तृणमूल काँग्रेस पक्षाला अवघ्या 80 जागांवर  समाधान मानावे लागले. एकप्रकारे या पराभवामुळे ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या राजकारणाचा एक सुवर्ण अध्याय  संपुष्टात आला, असं म्हणावं लागेल. 

Continues below advertisement

भाजपचा झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर पश्चिम बंगाल जणू भाजपमय झालं आहे. तृणमूल काँग्रेसची सत्ता पुन्हा पश्चिम  बंगालमध्ये येणार नाही,  असं ठामपणे भाजप पक्षातील काही नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अलिकडेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी, 'अनुपम खेर यांची केस उगवतील, पण तृणमूल काँग्रेसची सत्ता पुन्हा पश्चिम बंगालमध्ये येणार नाही', असं ठामपणे त्यांनी सांगितलं.  आपल्या विधानातून त्यांनी अनुपम खेर यांचा उल्लेख केल्यामुळे, अभिनेत्याने व्हिडीओ ट्विट करत एक मजेशीर सवाल उपस्थित केला आहे. 

समिक भट्टाचार्य नेमकं काय म्हणाले? (Anupam Kher reaction to BJP leader viral comment on X)

'तृणमूल काँग्रेसची सत्ता जाणार होती. हे घडणारच होतं. जे घडणार आहे, ते आपण काय, कुणीच नाही टाळू शकतं.  बघा आभाळ जमिनीवर येऊ शकतं.  समुद्र आभाळावर जाऊ शकतो. अनुपम खेर यांच्या टक्कलवर पुन्हा केस येऊ शकतात.  परंतु, तृणमूल काँग्रेसची सत्ता पुन्हा येणार नाही.  हे स्वप्नांच्या पलिकडे आहे. जे होणार होतं, ते झालं. जे घडणार नाही, ती गोष्ट करणं आणि घडवून आणणं, ही ताकद कुणामध्ये नाही', असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

Continues below advertisement

अनुपम खेर यांचं ट्विट व्हायरल

 

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी आपल्या विधानात अनुपम खेर या अभिनेत्याचा उल्लेख केला होता. यावर आता अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  त्यांनी समिक भट्टाचार्य यांचा व्हिडीओ ट्विट करत मजेशीर कॅप्शन दिलं आहे. त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'अरे भावा मी तुझं काय बिघडवलं आहे? तुम्हाला असे का वाटते की माझ्या टक्कलवर केस यावेत? माझ्या सध्याच्या अवस्थेत, मला तर कित्येक वर्ष नको आहेत... जय श्री राम..', असं अनुपम खेर म्हणाले. तसेच हसण्याचे इमोजी अॅड केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

125 कोटींची ज्वेलरी, 90 कामगार अन् 3 हजार तास; प्रसिद्ध बिझनेस वुमेनच्या 'गार्डन' ड्रेसचा रेड कार्पेटवर जलवा