Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death : कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. मात्र, वयाच्या 42 वर्षी तिचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यानं अनेकांकडून मृत्यूबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झालाय हे पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्येच समजणार आहे. मात्र, दुसरीकडे शेफाली जरीवालाच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अशातच हिंदुस्तानी भाऊ तिला पाहाण्यासाठी रुग्णालयात पोहोचलाय. यावेळी त्याने बहीण गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. (Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death)
हिंदूस्तानी भाऊ म्हणाला, फार वाईट झालं. आम्ही विचार सुद्धा करु शकत नाही की असं काही होऊ शकतो. वर्षातून दोन-तीन दिवस सकाळपासून सायंकाळपर्यंत माझा फोन वाजायचा. रक्षाबंधनाच्या वेळी, गणेशोत्सवावेळी आणि भाऊबीजेच्या वेळी तिचे फोन यायचे. आता मोबाईलमध्ये तिचं नाव आहे. पण मात्र, आता फोन वाजणार नाही. (Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death)
हिंदुस्तानी भाऊ शेफाली जारीवालाच्या निधनानंतर मुंबईतील कूपर रुग्णालयात पोहोचलाय. बिग बॉसमधील त्याच्या सहस्पर्धकाच्या मृत्यूची बातमी ऐकून ते खूप व्यथित झालेला पाहायला मिळालाय. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि तो तातडीने रुग्णालयात पोहोचलाय. हिंदुस्तानी भाऊ शेफालीचा मानलेला भाऊ होता. शोमध्ये त्यांच्या नात्यात सुरुवातीला बरेच चढ-उतार होते. त्यांच्यात तीव्र वाद देखील झाले होते. मात्र, त्यांनी नंतर सगळे मतभेद बाजूला ठेवले, घट्ट मैत्री केली आणि एक भाऊ-बहीण नातंही निर्माण झालं.(Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death)
दरम्यान, शेफाली जरीवालाचं शुक्रवार, 27 जून रोजी मुंबईत निधन झालं. रिपोर्टनुसार, तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. तिला पती आणि अभिनेता पराग त्यागी याने आणि आणखी तीन जणांनी त्यांना तातडीने मुंबईतील बेलव्ह्यू मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालाय. दरम्यान, शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. (Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death)
इतर महत्त्वाच्या बातम्या
दोन मुलांची आई, 44 वर्षांची संतूर मम्मी, श्वेता तिवारीने पलकसोबत शेअर केले खास फोटो