Hemant Dhome Reunites with Kadambari Kadam: मराठी सिनेसृष्टीत सध्या 'क्रांतीज्योती विद्यालय:मराठी माध्यम' या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर उत्तम घौडदौड सुरू आहे.  या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाचे  लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे सध्या 'क्रांतीज्योती विद्यालय:मराठी माध्यम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कादंबरी कदम हिनं देखील उत्तमरित्या भूमिका वठवली. ती हेमंतची जूनी मैत्रीण असून, हेमंतनं तिच्यासाठी खास एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. सध्या या पोस्टची सोशल मीडियात प्रचंड चर्चा होत आहे. कादंबरीसाठी हेमंतने नेमकी कोणती खास पोस्ट लिहिली? पाहूयात.

हेमंतची कादंबरीसाठी पोस्ट, दोघांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल

हेमंतने कादंबरीसोबतचा एका जुना फोटो सोशल मीडियात शेअर केला आहे.  तसेच 18 वर्षानंतरचा फोटो शेअर केला आहे. त्यानं या पोस्टला सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये "दोन छोटी मुलं मोठी झाली आहेत. या काळात केवढं काय काय घडून गेलं ना..  काय काय बदललं...तुझ्यासोबत कादंबरी पुन्हा काम करताना खूप आवडलं. खूप मजा आली. आता एवढं परत अंतर नको. त्या कोवळ्या बिचाऱ्या अभिजीतकडून हुशार मानसीला एक प्रेमळ पप्पी", असं हेमंत म्हणाला.

"प्रामाणिकपणे सांगतो आहे,  क्रांतिज्योतीमधील सुमन तुझ्याहून प्रेमळ कुणीच करू शकलं नसतं.   हे केवळ मी नाही तर, संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे.  तुझ्यासोबत माझा अभिनेता, लेखक आणि आता दिग्दर्शक  हा प्रवास  एका वर्तुळासारखा पूर्ण झाला आहे.  ते देखील अलिबागमध्येच पूर्ण झाला आहे.  लवकरच आपण पुन्हा एकत्र येऊ. तोवर क्षणभर विश्रांती", अशी हेमंतने खास पोस्ट कादंबरीसाठी लिहिली. हेमंतची ही खास पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या पोस्टवर मराठी सेलिब्रिटींनी कमेंट करत कौतुक केलं आहे. 

हेमंत ढोमे आणि कादंबरी कदम या दोघांची जोडी क्षणभर विश्रांती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. तेव्हापासूनची दोघांमधील मैत्री कायम आहे. 'क्रांतीज्योती विद्यालय:मराठी माध्यम' या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली. हेमंतने बऱ्याच वर्षांनंतर कादंबरीसोबत काम केलं. या चित्रपटाच्या निमित्ताने हेमंतने खास कादंबरीसाठी मैत्रीचा उल्लेख करत सुंदर आणि भावुक पोस्ट लिहिली. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.