Hema Malini On CJP Protest: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Parliament's Monsoon Session) पहिल्या दिवशी तरुणांच्या एल्गारानं दिल्ली पुरती हादरली होती. कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) 'चलो संसद' आंदोलन मोडीत काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मुक्त हस्तानं लाठीचार्ज केलाय. सोशल मीडियावर या आंदोलनाचे व्हायरल झालेले व्हिडीओ (CJP Protest Viral Video) हादरवणारे आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी (NEET Paper Leak Case) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत युवकांनी संसदेवर धडक मोर्चा काढला. त्यावेळी देशाचं भविष्य असणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांचा अख्खा फौजफाटा जंतरमंतरवर तैनात होता. या आंदोलनात तरुणांना पाठींबा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Actress Shabana Azmi), साऊथचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाहसुद्धा (Naseeruddin Shah) आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उपस्थित होते. एकीकडे सेलिब्रिटीही तरुणांना पाठींबा देत आंदोलनात सहभागी झाले, तर दुसरीकडे मात्र काही सेलिब्रिटींनी आंदोलनाला पाठींबा देणं नाकारलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हेमा मालिनी (Hema Malini) संसदेत उपस्थित होत्या. त्यावेळी आंदोलन करुन काहीही साध्य होणार नाही, असं म्हणत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलंय. 

Continues below advertisement

अभिनेत्री हेमा मालिनी नेमकं काय म्हणाल्या? (Hema Malini Comment On CJP Protest)

सोमवारी, नवी दिल्ली इथे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी उपस्थित होत्या. अधिवेशनानंतर, 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदेजवळ जमलेल्या आंदोलकांबाबत त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना दिसल्या. 'एएनआय' (ANI) वृत्तसंस्थेच्या एका व्हिडीओनुसार, हेमा मालिनी यांनी असं म्हटलंय की, अशा प्रकारे आंदोलन केल्यानं काहीही साध्य होणार नाही.

Continues below advertisement

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी व्हिडीओ क्लिपमध्ये म्हटलंय की, "जर एखादा मुद्दा असेल, तर त्यावर योग्य प्रकारे चर्चा व्हायला हवी. अशा प्रकारे आंदोलन करून काहीही साध्य होणार नाही. देशातील तरुण आणि शिक्षण व्यवस्थेचा विचार करता, आमचं मोदी सरकार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, आम्ही बरीच कामं केलीयत..." 

हेमा मालिनी यांचा कॉकरोच जनता पार्टीला सल्ला (Hema Malini Advice To Cockroach Janata Party)

पुढे बोलताना हेमा मालिनी म्हणाल्यात की, "तुम्ही करत असलेलं आंदोलन पूर्णपणे निरर्थक आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय की, प्रश्न संवादातूनच सोडवलं पाहिजेत... तुम्ही यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता, पण त्यांना चुकीच्या मार्गाला लावू नये, बरोबर ना? समस्या स्पष्टपणे समजावून सांगितली पाहिजे. एखाद्या सकारात्मक गोष्टीचा भाग होताना त्यांना आनंद वाटला पाहिजे..."

CJP च्या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाल्या हेमा मालिनी? (Hema Malini On Dharmendra Pradhan Resignation)

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य करण्यास हेमा मालिनी यांनी नकार दिला. परीक्षेतील कथित अनियमिततेमुळे प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हजारो तरुण 'पार्लमेंट स्ट्रीट'जवळ जमले होते आणि संसदेच्या दिशेनं कूच करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. 

प्रकाश राज आणि शबाना आझमी यांचा तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा 

अभिनेते प्रकाश राज, शबाना आझमी आणि पूनम पांडे तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचलेले. प्रकाश राज यांनी मंचावर 'सीजेपी' (CJP) सदस्यांसोबत सामील झाल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणारा मोठा तरुण वर्ग दिसत होता. एका भावूक क्षणी, शबाना यांनी अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या एका निदर्शकाच्या हाताचं चुंबन घेतलं. पूनम पांडेनं मीडियाशी बोलताना सर्वांना आठवण करून दिली की, हे आंदोलन राजकारण किंवा धर्माबद्दल नसून, 'नीट' (NEET) परीक्षेतील कथित अनियमिततेमुळे ज्यांचं आयुष्य प्रभावित झालंय, त्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Actor Vaibhav Mangale Post Viral: कोकणात बायंगं नावाचं भूत असतं, ते बसल्याजागी सगळं आणून देतं पण जाताना निर्वंश करुन जातं; वैभव मांगलेंची सूचक पोस्ट व्हायरल