Bollwood : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेलन (Helan) आज तिचा 86वा वाढदिवस साजरा करतेय. नव्वदीच्या घरात गेलेल्या या अभिनेत्रीनं तिच्या अभिनयानं ते दशक तर गाजवलंच पण तिनं नृत्यानं बोल्डनेसने साऱ्यांचीच मनं जिंकली. वयाच्या 86 व्या वर्षीही तिचा फिटनेस चाहत्यांचं लक्ष वेधून घेणार आहे. तिच्या फिटनेसने तिने सिद्ध केलंय की वय ही फक्त एक संख्या आहे. फिटनेस मिळवण्यासाठी कधीही उशीर होत नसतो. हेलनच्या वाढदिवसादिवशी तिची फिटनेस ट्रेनर, सेलिब्रिटी फिटनेस एक्सपर्ट यशिका कराचीवाला यांनी हेलन वर्कआउट करतानाचा एक गोंडस व्हिडिओ शेअर केलाय. या फिटनेस व्हिडिओचे सोशल मीडियावर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. यशिकानं सांगितलं की हेलन या वयातही पूर्णपणे स्वतंत्रपणे राहतेय आणि नियमितपणे तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करतेय. नव्वदीच्या उंबरण्यावर करता येतील असे काही सोपे व्यायमाचे प्रकारही हेलनने सांगितलेत. जे अगदी सहज कोणालाही करता येतील.

Continues below advertisement

व्यायाम 1 : खुर्चीवर बसणे

एक मजबूत खुर्ची शोधा आणि तिच्यासमोर उभे रहा. हळूहळू बसा आणि नंतर उभे रहा. या व्यायमाच्या पाच सेटने सुरुवात करा आणि हळूहळू 10-12 पर्यंत वाढवा. पायांची ताकद आणि संतुलन राखण्यासाठी हा व्यायाम उत्कृष्ट आहे.

Continues below advertisement

व्यायाम 2 – ब्रिजिंग

बेड किंवा चटईवर झोपा आणि तुमचे गुडघे वाकवा. हळूहळू तुमची कंबर वर करा आणि नंतर ती खाली करा. तुमच्या मानेवर ताण येणार नाही याची काळजी घ्या. या व्यायामामुळे पाठीचा कणा आणि कंबरे मजबूत होतात.

 

व्यायाम 3 - मार्चिंग

बेडवर झोपा, तुमचे गुडघे वाकवा आणि त्यांना टेबलटॉप स्थितीत वर करा. नंतर हळूहळू त्यांना जमिनीवर खाली करा. दुसऱ्या पायानेही असेच करा. तुमचे गुडघे तुमच्या छातीजवळ खूप जवळ येणार नाहीत याची काळजी घ्या.

चौथा व्यायाम - भिंतीवर पुश-अप्स

भिंतीकडे तोंड करून उभे रहा. तुमचे हात खांद्याच्या उंचीवर ठेवा. तुमचे पाय थोडे मागे ठेवा आणि संतुलन राखा. हळूहळू तुमचे शरीर वाकवा आणि पुश-अप्स करा. या व्यायामामुळे छाती, खांदे आणि हात मजबूत होतात.

पाचवा व्यायाम - रबर बेल्ट स्ट्रेचिंग

हातात रबर बेल्ट धरा आणि सरळ उभे रहा. बेल्ट हळूहळू तुमच्या डोक्यावरून उचला आणि तो स्ट्रेच करा. तुमच्या आराम पातळीनुसार प्रतिकार समायोजित करा. हा व्यायाम हात, खांदे आणि पाठीसाठी उत्तम आहे.

हेलनचा जन्म 21 नोव्हेंबर 1938 रोजी झाला. हेलन एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. तिने 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध नृत्यांगनांपैकी एक मानले जाते. तिच्या दीर्घ कारकिर्दीत, तिला 2009 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मश्री मिळालाय.